Headlines

सिंहस्थाच्या 35 कोटींच्या बोगस वर्क ऑर्डरसाठी तयार केले ॲप:नाशिकचे विभागीय आयुक्त, कुंभमेळा आयुक्तांचीही स्वाक्षरी




नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या कामांचे टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली ३५ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या हायटेक भामट्याला पोलिसांनी नवी मुंबईतून बेड्या ठोकल्या. अभिषेक संजय झरे (२३, रा. ऐरोली, नवी मुंबई) असे या ‘बीटेक’ पदवीधर संशयिताचे नाव आहे. त्याने फक्त मोबाइलमधील ‘ScanOnO’ या ॲपचा वापर करून विभागीय आयुक्तांची बनावट डिजिटल स्वाक्षरी तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. संशयिताने केवळ विभागीय आयुक्तांचीच बनावट स्वाक्षरी केली असे नव्हे, तर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचीही बनावट स्वाक्षरी असलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. याप्रकरणी त्याच्याविरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. असा उघड झाला ‘गेम’ या प्रकरणाचा सूत्रधार अभिषेक याने ३५ कोटींचे बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार केले होते. २८ एप्रिल रोजी नीळकंठ शेवाळे नावाच्या व्यक्तीने या पत्राची सत्यता पडताळण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात ते सादर केले. या प्रक्रियेदरम्यान विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल स्वाक्षरीतील स्पेलिंग ‘Praveen’ ऐवजी ‘Pravin’ आढळले. या एकाच चुकीने आरोपीचा संपूर्ण बनाव उघड झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सॉफ्टवेअर नाही, फक्त ‘ॲप’चा वापर आरोपी अभिषेक झरे हा उच्चशिक्षित असल्याने त्याने कोणत्याही मोठ्या किंवा परवानाधारक सॉफ्टवेअरचा वापर न करता अत्यंत हुशारीने फक्त मोबाइलमधील ‘ScanOnO’ या ॲपद्वारे डिजिटल स्वाक्षऱ्यांची नक्कल केली, हुबेहूब तशाच नवीन डिजिटल स्वाक्षऱ्या तयार केल्या आणि त्यांचा वापर करून बनावट शासकीय पत्रे तयार केली. दरम्यान, अभिषेकने तांत्रिक ज्ञानाचा वापर विधायक कामाऐवजी फसवणुकीसाठी केला. ॲपच्या साहाय्याने शासकीय मोहोर आणि डिजिटल स्वाक्षऱ्यांची हुबेहूब नक्कल केली. वर्धा ते नवी मुंबई कनेक्शन मूळचा वर्धा येथील असलेला हा तरुण नवी मुंबईत राहून हे रॅकेट चालवत होता. यामागे आणखी काही लोकांचा हात आहे का, त्याने आणखी कुणाला अशी पत्रे तयार करून दिली. ती त्याने कुणाच्या सांगण्यावरून तयार केली. स्वाक्षऱ्या स्कॅन करण्यासाठी त्याने अधिकाऱ्यांच्या मूळ स्वाक्षऱ्या कुठून मिळवल्या किंवा त्याला त्या कुणी दिल्या याचा तपास नाशिक रोड पोलिस ठाण्याचे निरीक्षक बडेसाब नाईकवाडे करत आहेत. एकूणच या प्रकरणामुळे डिजिटल गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. बनावट डिजिटल स्वाक्षऱ्या त्याच्या मोबाइलची तपासणी आली. त्यात केवळ डॉ. गेडाम यांचीच नाही, तर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्रही सापडले. कुंभमेळ्यातील ‘सीसीटीव्ही सर्वेक्षण’ आणि ‘एआय’ आधारित सुरक्षा यंत्रणेचे टेंडर मिळवून देण्यासाठी त्याने स्वाक्षऱ्यांद्वारे तयार केलेल्या पत्रांच्या आधारे एका ठेकेदाराकडून २० लाख रुपयांची मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *