![]()
कोपरगाव मतदारसंघाच्या जडणघडणीत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे २७ वर्षांचे मोठे योगदान आहे. आता त्यांचे नातू आणि संजीवनी कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या रूपाने कोल्हे कुटुंबातील तिसऱ्या पिढीने विधिमंडळाचा वारसा सुरू केला आहे, याचा
.
विधान परिषदेवर भाजपच्या वतीने विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने संजीवनी कारखाना कार्यस्थळावर त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
भाजपचे ज्येष्ठ प्रांतिक सदस्य पांडुरंगशास्त्री शिंदे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, केंद्रीय व राज्य नेतृत्वाने अहिल्यानगर जिल्ह्याची दखल घेत विवेक कोल्हे आणि सुनील कर्जतकर या दोन युवा नेतृत्वांना संधी दिली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर उभा केला, आता तीच गती विवेक कोल्हे कायम ठेवतील.
ज्ञानेश्वर परजणे म्हणाले, विवेक कोल्हे हे उच्चशिक्षित असुन त्यांचा सहकार, शिक्षण, कृषी, सामाजिक, सांस्कृतिक, पाणी, बँकींग, साखर कारखानदारी, औद्योगिक, ग्रामीण पायाभूत सुविधा आदि क्षेत्रात चांगला अभ्यास आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातुन त्यांनी मोठे युवा संघटन उभे केले आहे. त्यांच्या निवडींने प्रलंबित विकास कामांना चालना मिळेल. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाची विचारधारा थेट तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत युवानेते विवेक कोल्हे यांना संधी देत जिल्हावासियांना न्याय दिला आहे.
याप्रसंगी महंत दामोदर महानुभाव, फकिर बोरनारे, संभाजी बोरनारे, बापूराव परजणे उपस्थित होते. फटाक्यांच्या आतषबाजी आणि जयघोषात नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.