Headlines

Admin

पुण्यात गोळीबाराचा थरार!:वारजेतील सलूनमध्ये घुसून अंदाधुंद गोळीबार, दोन जण जखमी; परिसरात खळबळ

पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आज सायंकाळी 8 च्या सुमारात वारजे परिसरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. येथील एका सलूनमध्ये 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घुसून गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. जखमींना…

Read More

परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू:घाटीत 20 टक्के शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, रुग्णसेवा विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर येथील परिचारिकांचा संप चौथ्या दिवशीही सुरू असून, याचा परिणाम घाटी रुग्णालयातील आरोग्य सेवेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. या संपामुळे घाटी, सुपरस्पेशालिटी आणि कॅन्सर रुग्णालयातील नियोजित शस्त्रक्रिया सुमारे २० टक्क्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच, परिचारिकांना दुहेरी शिफ्टमध्ये काम करावे लागत आहे, ज्यामुळे रुग्णसेवेवर ताण वाढला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुमारे ८०० परिचारिकांनी संप पुकारल्याने…

Read More

सांवलिया सेठ मंदिरात एका महिन्यातील देणगीचा विक्रम:₹41.67 कोटी जमा झाले; भक्तांनी 600 ग्रॅम सोने, 84 किलोपेक्षा जास्त चांदी दान केली

चित्तौडगड (मेवाड) येथील श्रीसांवलिया सेठ मंदिराला एका महिन्यात मिळालेल्या देणगीच्या रकमेने नवा विक्रम केला आहे. एका महिन्यात (18 मार्च ते 16 एप्रिलपर्यंत) एकूण 41 कोटी 67 लाख 38 हजार 569 रुपये देणगीची रक्कम प्राप्त झाली. एडीएम आणि मंदिर मंडळाच्या सीईओ प्रभा गौतम यांनी सांगितले की, 16 एप्रिल रोजी चतुर्दशीच्या दिवशी मंदिराचा भंडार उघडण्यात आला होता….

Read More

चित्ते नदी पुनरुज्जीवन: ग्रामविकास संस्थेला जलभूषण पुरस्कार:मराठवाड्यातील 27 गावे दुष्काळमुक्त केल्याने गौरव

ग्रामविकास संस्थेला चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानासाठी महाराष्ट्र शासनाचा 2022 चा द्वितीय जलभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील मृतप्राय चित्ते नदीला पुनरुज्जीवित करून संस्थेने 27 गावे कायमची दुष्काळमुक्त केली आहेत, ज्यामुळे 15,000 ग्रामस्थांच्या जीवनात जलसमृद्धी आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला…

Read More

साताऱ्यात NCERT विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा:वृषालीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिवभक्तांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) कडून मराठा साम्राज्याचा नकाशा आठवीच्या अभ्यासक्रमातून वगळल्याच्या निषेधार्थ आज साताऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी केले. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा बांधव, नागरिक, नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे धारकरी, मुस्लिम बांधव तसेच…

Read More

काळजाचा थरकाप!:आंबेनळी घाटात दुचाकी 700 फूट खोल दरीत कोसळली; वाईचे दाम्पत्य जागीच ठार

महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात गुरूवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दाम्पत्य दरीत पडून जागीच ठार झालं. मोहन चव्हाण (वय ५५) आणि राजश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी, ता. वाई), असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. घाटातील धोकादायक वळणावर मोटरसायकल बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. पाऊस आणि धुक्यामुळे प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सनी खडतर परिस्थितीत रेस्क्यू…

Read More

भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे आता जागेवरच निवारण:मंत्री अतुल सावे यांनी दिली त्रिस्तरीय समित्यांची माहिती

राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावर समित्यांच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे तातडीने निवारण, अत्याचारांच्या घटनांवर त्वरित…

Read More

पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळली:गुवाहाटी हायकोर्ट म्हणाले – हे बनावट कागदपत्रांचे प्रकरण, पोलिस कोठडीतील चौकशी आवश्यक

गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित प्रकरणात काँग्रेस नेते पवन खेरा यांची अग्रिम जामीन याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती पार्थिव ज्योती सैकिया यांनी सांगितले की, खेरा यांनी रिनिकी भुईया सरमा यांच्यावर आरोप करण्यासाठी ज्या कागदपत्रांचा आधार घेतला आहे, ती पोलिसांनुसार आधीच बनावट सिद्ध झाली आहेत. न्यायालयाने म्हटले की, खेरा हे…

Read More

धीरेंद्र शास्त्रींचे आवाहन: 'चारपैकी एक मूल संघाला द्या':लोकसंख्या वाढीच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता

नागपूर येथे बागेश्वरधामचे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी देशभक्तीचा संदेश देताना ‘चार मुले जन्माला घाला आणि त्यापैकी एक मूल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,’ असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेद्वारा उभारण्यात येणाऱ्या ‘भारतदुर्गा मंदिर’च्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शास्त्री यांनी…

Read More

Paytm Payments Bank License Cancelled by RBI; UPI App Continues

मुंबई9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज आज २४ एप्रिलपासून पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड (PPBL) चा बँकिंग परवाना तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे. आरबीआयने म्हटले आहे की, बँकेच्या कामकाजामुळे ग्राहकांचे पैसे सुरक्षित नव्हते. तथापि, यूपीआय ॲप पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. आरबीआयने म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेकडे…

Read More