Headlines

Admin

नेते समाज आणि देशाला विसरून पैशाच्या मागे लागले:अण्णा हजारेंची संतप्त प्रतिक्रिया; राघव चढ्ढांसह 7 खासदारांचा भाजपमध्ये प्रवेश

देशाच्या राजकारणात आज एका मोठ्या राजकीय भूकंपाची नोंद झाली असून, ‘आम आदमी पक्षा’चे खासदार राघव चढ्ढा यांनी इतर 7 खासदारांसह अनपेक्षितपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशापूर्वी राघव चढ्ढा यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेतील ‘आप’च्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या धक्कादायक फुटीवर पक्षाचे प्रमुख…

Read More

'बाळू मामाचा अवतार' सांगणारा मनोहर भोसले पुन्हा गजाआड:कुर्डुवाडी पोलिसांकडून भोंदूगिरीप्रकरणी बेड्या, आर्थिक फसवणुकीचाही आरोप

स्वतःला बाळू मामाचा अवतार सांगणाऱ्या मनोहर मामा भोसलेला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा एकदा बेड्या ठोकल्या आहेत. भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीच्या ताज्या प्रकरणात कुर्डुवाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मनोहर भोसलेवर याआधीच करमाळा आणि सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात महिलांवर अत्याचार केल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याशिवाय बारामती आणि दौंड पोलीस ठाण्यांमध्येही त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरीचे…

Read More

उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा इशारा:पारा 42 अंशांच्या पार, पुढील 4 दिवस महत्त्वाचे; हवामान विभागाचा इशारा

राज्यात सध्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी पावसाचे सावट असे दुहेरी वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेचा कहर सुरू असून अकोला आणि वाशिम जिल्ह्यांत तापमानाने 42 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरही…

Read More

आशा भोसले यांना नात जनाई भोसलेने श्रद्धांजली वाहिली:लिहिले- हे शेवटचे रहस्य जे आपण एकत्र वाटून घेत आहोत, तुम्ही अखेरचा निरोप घेण्यापूर्वी

गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जनाईने एक फोटो शेअर करत तिच्या आजीसोबत घालवलेले ते क्षण आठवले, जे तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. तिने या प्रसंगाला एक ‘शेवटचे रहस्य’ म्हटले आहे, जे ती तिच्या आजीच्या निरोपापूर्वी तिच्यासोबत शेअर करत आहे. जनाई भोसलेने इंस्टाग्रामवर…

Read More

सुनेत्रा पवारांच्या निर्णयाची कसोटी:NCP मध्ये विधानपरिषदेसाठी रस्सीखेच; एक सीट, सहा इच्छुक, अंतर्गत स्पर्धा वाढली

बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष आगामी विधानपरिषद निवडणुकांकडे वळले आहे. येत्या 12 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सर्व पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार असल्याने राजकीय वातावरण तापले…

Read More

हिंदीनंतर इंग्रजी पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब:शिवरायांचा अपमान सहन होणार नाही; साताऱ्यात आज मोर्चा

इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हिंदी माध्यमातील पुस्तकातून हा नकाशा वगळण्यात आला होता. मात्र आता इंग्रजी माध्यमातील पुस्तकातूनही तोच नकाशा हटवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निर्णयावरून वाद अधिकच चिघळला असून, एनसीईआरटीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री…

Read More

खुनातील आरोपीला ओळखताच नातेवाईकांनीच घेतली धाव:नंतर दिले पोलिसांच्या ताब्यात; हिदायत पटेल हत्या प्रकरणात मोठी कारवाई

वरिष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वाची घडामोड घडली असून, या प्रकरणातील फरार आरोपी राजू बोचे याला अखेर साडेतीन महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. नागपुरातील रवीभवन परिसरात ही कारवाई झाली. विशेष म्हणजे, पोलिसांपूर्वीच हिदायत पटेल यांच्या नातेवाईकांनी आरोपीला ओळखून पकडले आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण…

Read More

वीजग्राहकांना प्रॉम्प्ट, ऑनलाईन पेमेंटने 9.60 कोटींची सवलत:महावितरणच्या गो-ग्रीन आणि डिजिटल सेवांचा वापर वाढला

छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजग्राहकांनी महावितरणच्या डिजिटल सेवांचा वापर करून मावळत्या आर्थिक वर्षात ९ कोटी ६० लाख रुपयांहून अधिक रकमेची सवलत मिळवली आहे. प्रॉम्प्ट बिल भरणा, ऑनलाईन पेमेंट आणि गो-ग्रीन या पर्यायांचा वापर केल्याने ग्राहकांना हा लाभ मिळाला आहे. महावितरण ग्राहकांना विविध सवलती देते. यात, सात दिवसांच्या आत बिल भरल्यास बिल रकमेच्या (कर व शुल्क वगळून)…

Read More

पुण्यात एसीबीचा मोठा दणका!:भूजल सर्वेक्षण विभागाचे दोन अधिकारी 2 लाखांची लाच घेताना रंगेहात अटकेत

पुण्यातील भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. इमारतीच्या पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी आवश्यक असलेला भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. ही कारवाई शिवाजीनगर येथील कार्यालयात करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे दिवाकर नामदेव धोटे (५३, वरिष्ठ भूवैज्ञानिक, वर्ग-१) आणि प्रियांका संदीपान…

Read More

संभाजीनगरात बनावट यूपीआय ॲप वापरून व्यापाऱ्यांना गंडवण्याचा फंडा:3 व्यापाऱ्यांकडून लाखोंची खरेदी, चौथ्या वेळी अडकले; तिघे अटकेत

डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढत असताना आता त्यातही फसवणुकीचा नवा फंडा चोरट्यांनी शोधला आहे. बनावट यूपीआय ॲपच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखा व सायबर पोलिसांच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. यात योगेश विनायक गव्हाणे (35, रा. कमळापूर, वाळूज), नितीन अनिल मुसमाडे (33, रा. कमळापूर) व रवी सुभाष राठोड (34, रा. बजाजनगर) अशी आरोपींची नावे असल्याची…

Read More