Headlines

Admin

दिव्य मराठी- 6 महिन्यांपूर्वी उबाठातून भाजपमध्ये, तरीही अध्यक्ष कसे केले?:अध्यक्ष गलांडे- पक्षात नवा-जुना असे काही नसते, अनुभवामुळे पद दिले

जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती बिनविरोध निवडून आणले आहेत. भाजपने 6 महिन्यांपूर्वी उबाठातून आलेल्या अविनाश गलांडे यांना अध्यक्ष केले. शिवसेनेने उबाठा अन् अपक्षांची मोट बांधून अध्यक्ष बसवण्याची तयारी केली होती. मात्र, भाजपने एका रात्रीत ‘गेम’ फिरवत बहुमताची ‘मॅजिक फिगर’ त्यांच्या बाजूने केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश…

Read More

तीन कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा अहवाल सादर करा:आमदारांकडून निर्देश, खते, बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी नियोजन करण्याचे आवाहन‎

जायकवाडी, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमुळे पैठण तालुक्यात वर्षभर पाणीसाठा राहतो. बागायत शेती सुरू राहते. खतांची मागणी सातत्याने वाढते. शेतकऱ्यांना खत व बियाण्यांचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनाने आतापासून काटेकोर नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार विलास भुमरे यांनी दिल्या. पंचायत समिती कार्यालयात खरीप हंगाम नियोजन बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. तसेच ३ कृषी सहायकांविरोधात निलंबनाचा…

Read More

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९…

Read More

राघव चड्ढा यांनी आप (AAP) सोडून भाजपमध्ये प्रवेश केला:सायन्सचा ऑस्कर जिंकणारे डॉ. अतनु यांना 30 लाख मिळतील, 25 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला 24 एप्रिल रोजी पंजाबमधील ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा केली. 2. सरकारने एव्हिएशन इंधनात इथेनॉल मिसळण्यास मंजुरी दिली 23 एप्रिल रोजी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू…

Read More

गलवाडा येथे शिवजयंती उत्साहात:ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक

तालुक्यातील गलवाडा येथे बुधवारी (दि.२२) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेची गावभर मिरवणूक काढण्यात आली होती. शिवाजीनगर (प्लॉट) येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ही मिरवणूक गलवाडा गावात पोहोचली. गावात सर्वत्र जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीनंतर सायंकाळी शिवजयंतीनिमित्त शिवव्याख्यानाचे…

Read More

लासूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरट्यांवर नजर:बाजार समिती परिसरात कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या, गुन्हेगारीला आळा बसणार‎

मराठवाड्यातील नंबर दोनची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापार पेठेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. त्यामुळे येथील चोऱ्या, गुन्हेगारीचे चित्रीकरण फुटेज थेट पोलिसांच्या तपासकामासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने बाजार समिती प्रशासनाकडून संपूर्ण अडत व्यापार पेठेत चहुबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे…

Read More

संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक:रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून शिंदेसेना, मनसेतील वाद वाढला

मराठी भाषा बोलता-लिहिता येणार नाही अशा रिक्षाचालकांवर १ मेपासून दंडात्मक तसेच परवाना निलंबन व रद्दची कारवाई केली जाईल, असा निर्णय शिंदेसेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दहा दिवसांपूर्वी घेतला. त्याला शिंदेसेनेचेच नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी विरोध केला. त्यांनी मुंबईतील हिंदी भाषिक तसेच रिक्षाचालकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला. दुसरीकडे १५ लाख रिक्षाचालकांनी ४ मेपासून संपावर…

Read More

भागवत म्हणाले- भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल, यात शंका नाही:राम मंदिर बांधण्याबाबतही लोकांना शंका होती, त्याचप्रमाणे हे ध्येयही आता निश्चित झाले आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, भारत निश्चितपणे विश्वगुरू बनेल आणि यावर कोणालाही शंका नसावी. ते म्हणाले की, एक काळ असा होता, जेव्हा लोक अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या निर्मितीबद्दल संशयात होते. ते याला अशक्य मानत होते. पण आज ते मंदिर सर्वांसमोर साक्षात उभे आहे. त्याचप्रमाणे, भारताचे विश्वगुरू म्हणून पुनरुत्थानदेखील पूर्णपणे निश्चित आहे…

Read More

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा आजपासून शंखनाद:30 नद्यांच्या कलशातून घुमणार जलसंवर्धनाचा जागर, अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम

राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आल . विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीच्या आधारे जलव्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प असून, अहिल्यादेवींनी दाखवलेला जलसंवर्धनाचा मार्ग आजच्या…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कचऱ्याची घंटागाडी 1 मेपासून रोज येणार; संकलनाची वाहने आता 350 वरून 477

घरोघरी कचरा संकलन आणि वाहतूक प्रकल्पाचे काम आता १ मेपासून सुरू करण्याचा मुहूर्त निघाला आहे. अहमदाबादच्या ‘वेस्टर्न इमॅजिनरी ट्रान्सकॉन प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला १९ नोव्हेंबर २०२५ रोजी हे काम दिले आहे. या कंत्राटानुसार ४७७ कचरा संकलन वाहनांचा ताफा उतरणार आहे. त्यामुळे आता रोज कचरा संकलन केले जाईल. पूर्वी ३५० वाहनांतून कचरा संकलन केले जात होते….

Read More