विधान परिषद निवडणूक – राष्ट्रवादीत कोट्यवधींच्या ऑफरपासून व्हिडिओपर्यंत लॉबिंग:'एमएमडी' फॅक्टर राबवण्याचीही मागणी
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका जागेसाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. एकूण 9 नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसह 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समीकरणे वेगाने बदलताना…