Headlines

Admin

जामठीत वसंतराव नाईक जयंतीनिमित्त अभिवादन:कृषी दिनानिमित मान्यवरांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै रोजी जामठी येथे कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे उद्यानविद्या शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर अल निनोच्या परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची निवड, तसेच फळबाग लागवडीबाबत त्यांनी…

Read More

दुर्लक्ष:पैठण एमआयडीसीतील सांडपाणी, विषारी वायुमुळे नागरिकांचे आरोग्य, शेती धोक्यात

एमआयडीसी परिसरातील रासायनिक (केमिकल) उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे आणि विषारी वायूमुळे मुधळवाडी, कारखाना परिसर, नारायणगाव आणि वाहेगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना फुफ्फुसाचे गंभीर आजार जडले असून, शेती पूर्णपणे नापीक झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक…

Read More

लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा:लोहगाव जिल्हा परिषद प्रशालेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व जनजागृती कार्यशाळा‎

विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांनी कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता स्वतः सक्षम व सुरक्षित राहावे आणि सजग नागरिक बनावे. शिक्षणासोबतच चांगले संस्कार, कायद्याचे पालन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप यांनी केले. लोहगाव येथील जिल्हा परिषद प्रशालेत १ जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व जनजागृती…

Read More

अमरनाथ यात्रा आजपासून, पहिला जत्था काश्मीरमध्ये पोहोचला:यात 4800 हून अधिक प्रवासी, प्रत्येक 2 किमीवर ऑक्सिजन बूथ; बालटाल मार्गावर 12 ठिकाणी वॉटरप्रूफ डोम

आजपासून पुढील 57 दिवस ग्रेटर हिमालयाच्या उंच दऱ्यांमध्ये बाबा बर्फानीचा जयघोष घुमणार आहे. अमरनाथ यात्रा सुरू झाली आहे. 28 ऑगस्टपर्यंत 4 लाखांहून अधिक भाविक 3,888 मीटर उंचीवर असलेल्या पवित्र गुहेत नैसर्गिकरित्या तयार झालेल्या शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकतील. गुरुवारी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पहिल्या तुकडीला जम्मूच्या भगवती बेस कॅम्पमधून बालटाल आणि पहलगामसाठी रवाना केले. या…

Read More

सिल्लोड शहरात अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे गुन्हेगारीत वाढ:सिल्लोड शहर पोलिस स्टेशनला 51 कर्मचारी व 5 अधिकारी अशी मंजूर संख्या‎

सिल्लोड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असली तरी पोलिसांची संख्या मात्र २५ वर्षांपूर्वी जी होती तीच असल्याने अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर शहराच्या सुरक्षेचा भार पडत असून यामुळे सिल्लोड शहरात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. . २०११ च्या जनगणनेनुसार सिल्लोड शहराची ५८ हजार लोकसंख्या आहे. परंतु आजच्या परिस्थितीत सिल्लोड शहराची लोकसंख्या ८० हजारांच्या आसपास असल्याचे चित्र आहे. या…

Read More

मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा- डॉ. खान:मायनॉरिटी एज्युकेशनल ऑर्गनायझेशनतर्फे जाहीर सत्कार‎

छत्रपती संभाजीनगर सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थित्यंतरे वेगाने घडत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. संयमित, सकारात्मक आणि शिस्तबद्ध वागणुकीतून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवण्यावर भर द्यावा. त्यानेच समाजाची सर्वांगीण प्रगती साधता येईल, असे प्रतिपादन माजी खासदार तथा माजी मंत्री डॉ. फौजिया खान यांनी केले. सामाजिक कार्य तसेच राज्यसभेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल फेडरेशन ऑफ…

Read More

स्वयंरोजगारासाठी नागपूर, तर सर्वाधिक वेतनासाठी नवी मुंबई टॉप:एनएसओच्या ‘मिलियन प्लस सिटी’ सर्वेक्षणाचा जून 2026 अहवाल

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या ४६ शहरांमध्ये मिलियन प्लस सर्वेक्षण केले आहे. याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. यात सर्वाधिक १० शहरे महाराष्ट्राची आहेत. संभाजीनगरला बेरोजगारीचा विळखा अधिक आहे. . मात्र नागपूर व ठाण्याच्या तुलनेत संभाजीनगरच्या नोकरदारांना वेतन अधिक आहे. विशेष म्हणजे, नवी मुंबईच्या नोकरदारांना सर्वाधिक ५१,५१५ रुपयांचे वेतन आहे. मुंबई दुसऱ्या…

Read More

युझरनेम फीचरवर व्हॉट्सअ‍ॅप नंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारचा सवाल – सायबर गुन्हेगारीचा धोका, रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात

युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवण्यात आली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी ऑनलाइन फसवणूक, बनावट ओळख आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, अशी विचारणा सरकारने या प्रकरणी केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सरकारने टेलिग्रामला विचारले आहे की, त्याला युझरनेम फीचर सुरू ठेवण्याची परवानगी का दिली…

Read More

थायलंडच्या ‘सायबर गुलामगिरी’तून भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्राची मोहीम:खा. अशोक चव्हाणांच्या पत्राची दखल; बीडच्या तरुणांचा समावेश

म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ‘सायबर गुलामगिरी’च्या भयंकर विळख्यात अडकलेल्या शेकडो भारतीय तरुणांच्या सुटकेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमधील स्थानिक सुरक्षा यंत्रणांना सोबत घेऊन ही आंतरराष्ट्रीय बचाव मोहीम राबवली जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील बीड, जळगाव, नाशिक, सातारा जिल्ह्यांतील तरुणांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे यासंदर्भात…

Read More

भाजप नगरसेवक, जि.प. सदस्यांना बँकेच्या निवडणुकीची जबाबदारी:जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न

स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि जिल्हा परिषदेनंतर आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवला आहे. जिल्हा बँक महायुतीच्या ताब्यात यावी म्हणून भाजपने नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांना प्रचारासाठी लावले आहे. येत्या ४ जुलै रोजी जिल्हा बँकेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी मतमोजणी होईल….

Read More