सलाइन खुंटीला, आयुष्य टांगणीला:श्रीगोंदा तालुक्यातील कौठा येथे बंगाली डॉक्टरने पत्र्याच्या खोलीत थाटले क्लिनिक; बीएएमएसची पदवी बोगस
अहिल्यानगरच्या श्रीगोंदे तालुक्यात ६ हजार लोकसंख्या असलेल्या कौठा गावात बीएएमएस डॉक्टर असल्याचा दावा करत एक बोगस बंगाली डॉक्टर ८ वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहे. वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही वैध परवाना नसताना “श्रीसान क्लिनिक’ नावाचे क्लिनिक सौरभ अधिकारी याने थाटल्याचे “दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आले आहे. क्लिनिकच्या भिंतीवर लावलेली प्रमाणपत्रे पश्चिम बंगालच्या “इंडियन कौन्सिल ऑफ पॅरामेडिकल सोसायटीज’ या…