Headlines

Admin

आमचा एकही आमदार कुठेही जाणार नाही!:ठाकरेंच्या 6 खासदारांची फूट आणि आत्रामांच्या दाव्यानंतर शरद पवारांचे बंडखोरीच्या चर्चेवर स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ आणि बंडखोरीच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटाचेही खासदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून विधानसभेत घमासान:बदल्यांच्या मुद्द्यावरून मुनगंटीवार आक्रमक; आशिष शेलारांनी 'सूडाच्या राजकारणा'वरून ठणकावले

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत बुधवारी चांगलाच गदारोळ झाला. ‘महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक 2026’वर चर्चा सुरू असताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला. या वादावर प्रतिक्रिया देताना मंत्री आशिष शेलार यांनी, तुमचा सूड घेणारा अजून महाराष्ट्रात जन्माला यायचा आहे,…

Read More

धमक्या देणाऱ्यांना सोडणार नाही:कोणाचेही घर उडवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धमक्यांच्या प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. कोणालाही धमकावणे किंवा कोणाचेही घर उडवण्यासारख्या धमक्या देणे सहन केले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांना कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश असल्याचे सांगितले. ‘कोणालाही घाबरण्याचे कारण नाही’ नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री…

Read More

नांदेडमध्ये 18 महिन्यात 217 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:175 आत्महत्या पात्र, 12 प्रकरण अपात्र; 30 प्रकरणे अजूनही चौकशीत

जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्य संपता संपत नसल्याचे चित्र वारंवार पुढे येत आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या १८ महिन्यात तब्बल २१७ शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. यातील केवळ १७५ आत्महत्या शासनाने पात्र ठरवले असून १२ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर चौकशीसाठी 30 प्रकरण प्रलंबित असून आत्तापर्यंत…

Read More

आत्रामांनी 5 खासदारांची नावे सांगावी:ते माझ्याशी बोलले तर आम्ही 8 ही जण येऊ, खासदार फुटीच्या दाव्याची सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात असतो. आम्ही सर्व जण खरगे यांच्या ऑफीसमध्ये बसून चर्चा करत असतो, कोण काय बोलणार, कोणत्या बिलावर चर्चा करणार यावर आम्ही सर्व काही ठरवतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 5 खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात असे धर्मरावबाबा आत्रात…

Read More

NCERT Emergency 1975-77 । Class 9th Social Science Book syllabus NEP 2020

नवी दिल्ली21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NCERT म्हणजेच नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने पहिल्यांदाच इयत्ता 9वीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकात 1975-77 च्या आणीबाणीचा समावेश केला आहे. ‘अंडरस्टँडिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड’ या नवीन पुस्तकात आणीबाणीला भारतीय लोकशाहीसमोर आलेल्या सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून वर्णन केले आहे. ANI च्या अहवालानुसार, NCERT च्या एका अधिकाऱ्याने पुष्टी केली…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस:शेतकरी कर्जमाफी, कायदा-सुव्यवस्था आणि महत्त्वाच्या घोषणांवर आजही सभागृह तापण्याची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. कालचा तिसरा दिवस विधानसभा आणि विधान परिषदेत चांगलाच वादळी ठरला. वीजदरवाढ, धर्मांतर, कायदा-सुव्यवस्था आणि विविध जनहिताच्या प्रश्नांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी आकडेवारीसह प्रत्युत्तर देत सरकारची भूमिका स्पष्ट केली. वीजदरांवर मुख्यमंत्र्यांची मोठी ग्वाही विरोधकांच्या वीजदरासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र…

Read More

भोंदू अशोक खरातच्या पत्नीला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर:सिन्नर फसवणूक एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन, शिर्डी प्रकरणात मात्र अद्याप दिलासा नाही

दैवी शक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या कथित प्रकरणात संशयित असलेल्या भोंदू कॅप्टन ऊर्फ अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातला नाशिक रोड अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल फसवणूक प्रकरणात न्यायालयाने हा दिलासा दिला असून, एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर जामीन…

Read More

महाविकास आघाडीच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी:पावसाळी अधिवेशनादरम्यान एकजुटीवर प्रश्नचिन्ह; नेत्यांनी दिली स्पष्टीकरणे

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला नुकतीच सुरुवात झाली असून सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीने (MVA) बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश असल्याने महाविकास आघाडीचे टेन्शन…

Read More

Indian Passport Not Citizenship Proof: Govt Statement

Marathi News National Indian Passport Not Citizenship Proof: Govt Statement | Ministry Of External Affairs नवी दिल्ली43 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले आहे की, भारतीय पारपत्र (पासपोर्ट) नागरिकत्वाचे प्रमाणपत्र नाही, तर प्रामुख्याने एक प्रवास दस्तऐवज आहे. सरकारने १४ व्या पारपत्र सेवा दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंत्रालयाने स्पष्टीकरणात म्हटले आहे…

Read More