डॉ. आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद:मोतीबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यालयात 100 जणांनी केले रक्तदान
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मोतीबाग कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे आयोजित या शिबिरात १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे या शिबिराचे चौथे वर्ष होते. शिबिराचे उद्घाटन शाश्वत अकॅडमीचे संचालक महेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील…