दिगाव येथे पतीच्या निधनाचा धक्का असह्य:4 तासांत पत्नीनेही सोडले प्राण, पती हरी सुसुंद्रे यांचे दीर्घ आजाराने तर पत्नी भागाबाई यांचे ह्रदयविकाराने निधन
. सुख-दुःखात सोबत राहू आणि मृत्यूच्या दारातही साथ निभावू, या उक्तीची प्रचिती देणारी हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील दिगाव येथे घडली आहे. सुसुंद्रे कुटुंबातील वृद्ध पती-पत्नीचा अवघ्या चार तासांच्या अंतराने मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिगाव येथील रहिवासी हरी सांडू सुसुंद्रे (८०) यांचे गुरुवारी (९ जुलै) रात्री १० वाजेच्या सुमारास दीर्घ…