शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा:बनावट, खते निविष्ठांपासून सावधान राहा, दापोरीत फलोत्पादन पिकांच्या कीड-रोग व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षण
“हवामान बदलाच्या या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसेच खते व बियाणे खरेदी करताना विशेष दक्षता घेऊन बनावट कृषी निविष्ठांपासून स्वतःचा बचाव करावा. माती परीक्षणावर आधारित अल्प खर्चिक नैसर्गिक शेतीकडे वळावे,” असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तालुक्यातील दापोरी येथे कृषी विभागातर्फे सन २०२६-२७ अंतर्गत आयोजित “फलोत्पादन पिकांवरील कीड…