Headlines

Admin

महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई!:पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्कात असलेल्यांवर राज्यभरात 150 ठिकाणी छापे

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर, एटीएसने मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा आणि छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या…

Read More

राम मंदिरात अजूनही चंपत राय सर्वात शक्तिशाली:खास लोक 1800 कोटी रुपयांची खाती सांभाळत आहेत, व्हीआयपी दर्शनाचे कंत्राट घेत आहेत

राम मंदिराच्या परिसरात चंपत राय यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. दैनिक भास्करच्या तपासणीत असे समोर आले आहे की, ट्रस्टमधून बाहेर पडल्यानंतरही व्हीआयपी पास वाटपामध्ये चंपत राय यांचाच प्रभाव आहे. मंदिराचे 1800 कोटी रुपयांचे निधी ज्या बँक खात्यांमध्ये आहे, तेही त्यांचे खास लोक सांभाळत आहेत. असे तेव्हा आहे, जेव्हा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये देणगी चोरीच्या आरोपांनंतर…

Read More

हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पिकविमा योजना जाहीर:31 जुलैपर्यंत विमा भरता येणार

हिंगोली यंदाच्या खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पिकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पाच पिकांचा समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी दिली आहे. जिल्ह्यात या वर्षी पिकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स…

Read More

तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना पाणी कधी?:अंबादास दानवेंचा सरकारला सवाल; मंत्री उदय सामंत म्हणाले- त्रुटींची चौकशी, स्वतंत्र समिती नेमणार

छत्रपती संभाजीनगर शहराच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेवरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरत, “तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना नेमकं पाणी कधी मिळणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पातील त्रुटी मान्य करत स्वतंत्र चौकशी…

Read More

आमची अन् काँग्रेसची विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही:पक्षात कोणीही नाराज नाही, अन् असला तर बाहेर बोलणार नाही; चव्हाणांच्या दाव्यावर सुळेंचे उत्तर

पृथ्वीराज चव्हाण आणि माझी भेट काही झाली नाही. त्यांना आमचे कोणते खासदार भेटले आणि ते त्यांना अस्वस्थ वाटले माहिती नाही. आमच्या पक्षाचे 8 ही खासदार एक कुटुंब म्हणून काम करत असतो, आमच्यातील कोणी त्यांना भेटले असे मला वाटत नाही, पण ते राज्याचे मोठे नेते आहेत त्यांच्या कानावर काही आले असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे…

Read More

बच्चू कडूंचा सभागृहात संताप:'प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात', सचिन अहिरांनी घेतला आक्षेप

विधान परिषदेत सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. दिव्यांग, अनाथ, एकल महिला आणि भिक्षेकरी यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप करताना त्यांनी, “कधी-कधी प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात,” असे वक्तव्य केले. या विधानावर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर…

Read More

मालेगाव SIR वरून किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप:'बांगलादेशींना हिंदू ठरविण्याचा अड्डा', 1.26 लाखांहून अधिक संशयास्पद मतदारांचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून मालेगावातील मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव हे “बांगलादेशींना हिंदुस्थानी आणि हिंदू ठरविण्याचा अड्डा बनत आहे,” असा आरोप करत त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशयास्पद मतदार आढळल्याचा दावा केला. सोमय्या म्हणाले की, अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदींमध्ये बदल करून सुमारे 15 हजार बेकायदेशीर जन्म…

Read More

Maharashtra CM & Deputy CM To Give Strong Reply To Opposition Charges Today

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी आतापर्यंत उपस्थित केलेले विविध प्रश्न, आरोप आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्याचे म . दरम्यान, कालच्या कामकाजात नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, पिंपरी-चिंचवड कचरा डेपो दुर्घटना, ‘लोकराज्य’ मासिकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उलट्या छायाचित्रावरून झालेला गदारोळ आणि…

Read More

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज:आज कोर्टात हजर करणार; दोन डॉक्टरांचे राजीनामे, निलंबनाची मागणी जोरात

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना थेट कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत ते कळवा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यापूर्वी रमेश…

Read More

नाशिकच नाही, संपूर्ण राज्यातील अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार:उदय सामंतांचा मोठा दावा, खडसे-तावडे भेटीवरही केले भाष्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. याचवेळी, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या…

Read More