उंडणगाव येथे ध्वजारोहणाने बालाजी उत्सवास सुरुवात:विधिवत केली पूजा, टाळ-मृदंगाच्या निनादात गाव भक्तिरंगात, हजार भाविकांनी केले टक्कल
गावातील ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या वार्षिक उत्सवाला अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. व्यंकटरमण “गोविंदा… गोविंदा… जय बालाजी महाराज”च्या जयघोषात मंदिराच्या कळसावर विधिवत ध्वज उभारण्यात आला. ११ दिवस चालणाऱ्या भव्य उत्सवाची सुरुवात झाली. . या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पुराणकाळापासून चालत आलेल्या सामाजिक व धार्मिक परंपरांचे आजही गावकरी अत्यंत श्रद्धेने पालन करतात. उत्सव काळात गावातील पुरुष…