मस्क यांच्या स्टारलिंकचा भारतातील प्रवेश जवळपास निश्चित:कंपनीने म्हटले- 20 ग्राउंड स्टेशन व शेकडो अँटेना तयार, फक्त अंतिम सरकारी मंजुरीची प्रतीक्षा
एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची सॅटेलाइट इंटरनेट सेवा ‘स्टारलिंक’ भारतात सुरू होण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. कंपनीने सांगितले की, सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्राउंड इन्फ्रास्ट्रक्चरचे काम पूर्ण झाले आहे. आता स्टारलिंकला केवळ अंतिम नियामक मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. देशभरात २० स्टेशन आणि शेकडो अँटेना तैनात स्टारलिंकने देशभरात २० गेटवे साइट्स उभारल्या आहेत. हे गेटवे…