पिठात चक्क कीटक, अन् काळे तेल:गायत्री मेवाड अन् छप्पन भोगचा परवाना निलंबित, दोन्ही हॉटेलमध्ये अन्नसुरक्षेचे गंभीर उल्लंघन, अन्न् व औषध प्रशासनाची कारवाई
‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी (२१ ऑगस्ट) केलेल्या कारवाईत क्रांती चौकातील मे. गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड आणि बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल या दोन्ही आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित केले. गायत्री मेवाडमध्ये स्वयंपाकघरात भाजीसाठी कापून ठेवलेले पनीर दुर्गंधीयुक्त आढळले. तयार ग्रेव्ही…