Headlines

वीजपुरवठा खंडित झाल्याने पीक नुकसान; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न:लेखी आश्वासनानंतर अंजनगावमधील शेतकरी झाडावरून खाली उतरला

अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने पिकांचे नुकसान झाल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील लिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ते झाडावरून खाली उतरले. खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती. रात्री साडेदहा ते सकाळी साडेतीन या वेळेत होणारा…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य:सरकारच्या निर्णयाविरोधात गुणरत्न सदावर्ते मैदानात, म्हणाले- कायद्यात भाषेची सक्ती नाही

राजधानी मुंबईत मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकारण नेहमीच तापलेले असते, अशातच ज्या रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी लिहिता किंवा वाचता येत नाही, त्यांचे परवाने रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, मराठीच्या आग्रहासाठी घेतलेल्या या भूमिकेला आता विरोधही सुरू…

Read More

पुणे-वाराणसी 'अमृत भारत' एक्सप्रेसला मंजुरी:पुणे-जबलपूर रेल्वेही नियमित होणार, प्रवाशांची प्रतीक्षा संपली

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यामुळे पुण्यातून उत्तर भारताकडे जाणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये हडपसर (पुणे) ते बनारस (वाराणसी) दरम्यान नवीन ‘अमृत भारत’ रेल्वे सुरू करण्याचा आणि सध्याची पुणे-जबलपूर स्पेशल ट्रेन नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मोहोळ यांना पत्र लिहून…

Read More

पुणे बालपुस्तक जत्रा 30 एप्रिलपासून:गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे 4 मे पर्यंत विनामूल्य आयोजन

पुणे बालपुस्तक जत्रेचे ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही जत्रा विनामूल्य भरवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी, कला संस्कृतीची माहिती मिळावी आणि त्यांना साहित्य संस्कृतीचा…

Read More

संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-2026 ची घोषणा:जीव वाचवणाऱ्यांचा हेल्प रायडर्सतर्फे सन्मान होणार

हेल्प रायडर्स संस्थेने ‘संजीवनी जीवनरक्षक पुरस्कार-२०२६’ ची घोषणा केली आहे. मानवतेची सेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्पर मदत करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. पुढाकार घेतलेल्या हेल्प रायडर्स संस्थेने समाजात एक सकारात्मक ओळख निर्माण केली आहे. संस्थेचे प्रमुख कार्य म्हणजे वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून देणे, अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात पोहोचवणे आणि इतर…

Read More

भाजपच्या राज्यात 'नारीशक्ती' बाजूला:जनगणना अन् परिसीमनाचा संबंध जोडताना मुख्यमंत्र्यांची उडाली गाळण, काँग्रेसचा टोला

काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनी महिला आरक्षणावरून काँग्रेसवर केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत महिला नेत्या उपस्थित होत्या. पण महिलांचा पुळका दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या महिलांना साधे आपले मत मांडू द्यावे असेही वाटले नाही. अर्थात भाजपच्या राज्यात नारीशक्ती अशीच बाजूला राहते, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यासंबंधी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधताना…

Read More

भोंदू बाबांचे प्रस्थ सरकार पुरस्कृतच:'अंनिस'च्या श्याम मानव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा

सध्या राज्यात भोंदू खरात प्रकरण गाजत आहे. प्रदीप मिश्रा, धिरेंद्र शास्त्री, बागेश्वर यांच्या सारखे बुवा बाबांचे मोठं प्रस्थ वाढत आहे. अशोक खरातवर कारवाई करण्यात आली ते योग्यच झाले. पण धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर आणि इतरांवर कारवाई का नाही? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव यांनी उपस्थित केला. राज्यात बुवा बाबांचे…

Read More

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुस्तकाचे प्रकाशन:डॉ. मुजुमदार म्हणाले, 'भारताची प्रतिभा' कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्त्वाचा मिलाप

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या ‘भारताची प्रतिभा’ या पुस्तकाचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले. यावेळी पद्मभूषण डॉ. शां.ब. मुजुमदार यांनी प्रतिभाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक करत, त्या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्त्वाचा मिलाप असल्याचे म्हटले. धर्म ही शक्ती आहे, अत्याचार करणारे शास्त्र नाही, तसेच आपली राज्यघटना धर्मग्रंथाप्रमाणे मानायला हवी, असे विचार प्रतिभाताई…

Read More

हेल्मेट सक्ती, वाहतुकीचे नियम पाळा:अपघात झाल्याच्या स्थितीत जखमींना तत्काळ मदत करा, पोलिस अधीक्षक निलाभ रोहन यांचे आवाहन

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करून जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी सोमवारी ता २० येथे केले. येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना पोलिस अधीक्षक निलाभ रोहन म्हणाले की हिंगोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून अपघाताचे प्रमाण हे लक्षणीय…

Read More

गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाची मोठी कारवाई:12 शिकारी जेरबंद, दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष जप्त; कठोर कायदेशीर कारवाई सुरू

गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाने मोठी कारवाई करत १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दुर्मिळ वन्यजीवांचे अवशेष आणि शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी दबा धरून…

Read More