Headlines

चिखलदऱ्यात रुजणार ‘मधुपर्यटन' संकल्पना:आमझरीच्या मधाला नव्या वाटा मिळवून देण्यासाठी झटणार 3 संस्था

मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या मेळघाटमधील आमझरीचे मध आता सर्वदूर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी तीन संस्थांनी आपसात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एमओयू झालेल्या या तीन संस्थांमध्ये ग्रामपंचायत, वन विभाग व खादी-ग्रामोद्योग महामंडळाचा समावेश आहे. हा ऐतिहासिक एमओयू जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल भवनात पार…

Read More

अतिक्रमण हटवून माळीवाडा वेशीचे संवर्धन करा:भारतीय पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निर्देश‎

शहराच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक माळीवाडा वेशीभोवती पडलेला अतिक्रमणाचा विळखा तातडीने दूर करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, ती भावी पिढीसाठी जतन करणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे पत्र औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षण पुरातत्त्वविदांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्रात माळीवाडा गेटच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देण्यात आली आहे. निजामशाही…

Read More

आजच्या पिढीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विविध संस्था संघटनांच्यावतीने अभिवादन‎

. तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजाला सर्वाधिक गरज आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी जे कार्य केले, ते अत्यंत…

Read More

ई-पीक पाहणी, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार:7/12 वरील पीक नोंदींसाठी शासनाचे निर्बंध

ई-पीक पाहणी (डीसीएस- डिजिटल क्रॉप सर्व्हे) प्रकल्पाच्या अंमलबजावणीत होणारी दिरंगाई आणि तांत्रिक गोंधळ संपवण्यासाठी महसूल व वन विभागाने नवीन शासन परिपत्रक काढून सर्वच विभागांचे कान उपटले आहेत. आता केवळ कागदी घोडे नाचवून चालणार नाही तर जिल्हाधिकाऱ्यांपासून ते गावपातळीवरील सहायकांपर्यंत प्रत्येकाला मैदानात उतरून १००% अचूक नोंदणी करावी लागणार आहे. पीक पाहणीची संपूर्ण पद्धतच बदलली असून कृषी…

Read More

20 अपघातग्रस्तांच्या वारसांना 40 लाख‎:ऑनलाईन प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही‎

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेतून मयत शेतकऱ्याच्या पत्नीला दोन लाख अनुदान मंजुरीचे पत्र देतांना इगतपुरी कृषी विभागाचे उपकृषी अधिकारी किशोर भरते. शेती करतांना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात व अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. यामुळे कुटुंबाचे आर्थिक साधन बंद होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला…

Read More

दाहकता:चिंचवण येथे पाणीटंचाई; टँकरचा प्रस्ताव रखडला, गावची पाणीपुरवठा विहिर पूर्ण आटली‎

चिंचवण (ता. सिल्लोड) येथे २० फेब्रुवारीपासून सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीचे पाणी पूर्णतः आटल्याने गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासक यांनी परिसरातील खासगी विहिरींची पाहणी केली. मात्र कोणत्याही विहिरीतून दररोज दरडोई किमान २०…

Read More

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश:अतिक्रमण काढण्यापूर्वी पुनर्वसन करावे, वेरूळला भक्त निवासासह इतर कामे पूर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शनिवारी वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन वेरूळ विकास आराखड्याबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच बैठक होती. त्यांनी अतिक्रमण हटवण्यापूर्वी पुनर्वसनाचा विचार करण्याचे निर्देश दिले असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी आवश्यक सुविधा, भक्त निवास आणि मंदिर परिसरातील महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले. वेरूळ विकास…

Read More

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त लाडसावंगी गावात पायी पदयात्रा

क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गावात उत्साहाचे वातावरण होते. विविध कार्यक्रम घेण्यात आले. लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन झाले. येथून भव्य पायी पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मानवंदना…

Read More

पांगरा शिंदेत 2 वर्षांपूर्वी पथकाची पाहणी:भूकंपाच्या कारणांचा अहवाल दिला नाही, भूकंपाचे केंद्र असलेल्या गावाचा शनिवारी रात्रीचा मुक्काम घराबाहेर

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पांगरा शिंदे (ता.वसमत)गावात होता. या गावात गेल्या ७ वर्षांत भूकंपाचे ६ धक्के बसले आहेत. तसेच वारंवार भूगर्भातून आवाज येण्याचे प्रकार घडतात. जुलै २०२४ मध्ये आपत्ती व्यवस्थापन . हिंगोली जिल्ह्यात १० जुलै २०२४ रोजी झालेल्या भूकंपानंतर हा मुद्दा विधानसभेत गाजला होता. यासंदर्भात भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण करण्याची घोषणा राज्य सरकारने…

Read More

बारामतीत प्रचाराला जाणार- रोहित पवार:निवडणूक उमेदवारावर नाही, तर अजित पवार यांच्या कामावर होत आहे

“बारामतीची निवडणूक ही केवळ आत्ताच्या उमेदवाराकडे पाहून नाही, तर अजित पवार यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर लढली जात आहे. आम्हाला बोलावले नाही तरी आम्ही प्रचाराला जाणार,’ असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. शनिवारी पवार हे ईदमिलन कार्यक्रमासाठी तसेच पदाधिकारी शिष्टमंडळाच्या भेटीसाठी शहरात आले होते. बारामतीत अजित पवार यांच्याकडे बघूनच सुनेत्रा पवार यांना मतदान होणार….

Read More