Headlines

समाजमाध्यमांचा सजगपणे वापर करा; ऑनलाइन फसवणुकीपासून सावध रहा:सटाणा काॅलेजमध्ये पोलिस निरीक्षक पाटील यांचे आवाहन‎

विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा विधायक व सकारात्मक कामांसाठी वापर करावा. द्वेषपूर्ण संदेशांची देवाणघेवाण टाळून ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नेहमी सजग राहावे, असे आवाहन सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी केले. मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना. म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘सायबर सिक्युरिटी’ विषयावरील कार्यशाळेत…

Read More

परमेश्वराएवढी कोणतीही मौल्यवान वस्तू नाही- आनंद चैतन्य महाराज:अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराने केले होते आयोजन‎

परमेश्वराएवढी जगात कोणतीही मौल्यवान वस्तू नाही, प्रेमासारखा अन्य कोणताही मार्ग नाही आणि सद्गुरूंसारखा सज्जन कोणीच नाही; हे सत्य जाणून घेऊनच प्रत्येकाने आपल्या जीवनाची वाटचाल करावी, असे प्रतिपादन आनंद चैतन्य महाराज यांनी केले. भांबरवाडी येथे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारा’च्या वतीने आयोजित सत्संग सोहळ्यात ते बोलत होते. गुरुपौर्णिमेच्या औचित्याने या सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. प्रवचनादरम्यान…

Read More

मंत्रिमंडळ बैठकीत संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांमध्ये नव्या न्यायालयांना मंजुरी:गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत 200 कोटी तरतूद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नांदेड, बीड आणि पुणे जिल्ह्यांत नवीन न्यायालये, सरकारी वकील कार्यालयाची स्थापना आणि १४५ पदनिर्मितीसह १,२७,०१,५३६ रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेस मुदतवाढीसह विस्तारास मंजुरीचा तसेच राज्य माहिती आयोगाच्या बृहन्मुंबई, नाशिक, अमरावती खंडपीठांत ३ वर्षांसाठी तीन अतिरिक्त राज्य…

Read More

MH 12 कोड कायम राहणार:पुण्याच्या वाहन नोंदणीची ओळख अबाधित ठेवण्यास नितीन गडकरींची ग्वाही

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या एमएच १२ झेडझेड ही शेवटची मालिका सुरू असून, विद्यमान नोंदणी मालिका संपत आल्याने पुढील पर्यायी मालिकांबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचा वाहन नोंदणी कोड एमएच १२ बदलला जाणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, पुण्याची ओळख बनलेला हा कोड कायम ठेवण्याबाबत सकारात्मक घडामोड झाली आहे….

Read More

एनएचएमच्या कायमस्वरूपी यादीवर 224 तक्रारी:काही कर्मचाऱ्यांची नावे, तारखा, पात्रता चुकीची; 8 ऑगस्टला अंतिम यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत दीड हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी ५२५ जणांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर सुमारे २२४ जणांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींमध्ये काही अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे अर्धवट उमटणे, नेमणूक तसेच खंड कालावधीच्या तारखा चुकीच्या असणे आणि शैक्षणिक पात्रतेची माहिती अपूर्ण…

Read More

परिचारिकांचे दोन तास 'काम बंद' आंदोलन:सुधारित सेवा नियम आणि पदोन्नतीसाठी रुग्णालयाबाहेर निदर्शने

अमरावती येथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या (एमजीएनएफ) नेतृत्वाखाली परिचारिकांनी मंगळवारी, ४ ऑगस्ट रोजी दोन तास ‘काम बंद’ आंदोलन केले. सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील प्रलंबित मागण्यांसाठी हे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, जीएमसी आणि क्षय रुग्णालयात सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत परिचारिकांनी घोषणाबाजी करत…

Read More

'त्या' वादग्रस्त पोस्टशी माझा संबंध नाही!:'गुंगी गुडिया' वादावर पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण, म्हणाले- सुनेत्रा पवार कृतीतून उत्तर देतील

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बीड दौऱ्यातील एक व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या सोशल मीडियावरून त्यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख करण्यात आला. या आक्षेपार्ह टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या भाषेवर कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. “एका पक्षाला ही भाषा शोभते का? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा…

Read More

दोन महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल:खोट्या पंचनाम्याचा अहवाल दडपण्यासाठी 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप

खोट्या पंचनाम्याचा अहवाल सादर न करण्यासाठी १० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शिवाजीनगर तलाठी कार्यालयातील तलाठी आणि कोतवालाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदार हे ३७ वर्षीय खोदकाम कंत्राटदार आहेत. त्यांच्या कंपनीकडून सेनापती बापट रस्त्यावरील एका व्यावसायिक प्रकल्पासाठी इमारतीच्या पायाचे…

Read More

"हा केवळ माझ्या आईचा नाही, तर प्रत्येक महिलेचा अपमान!":सुनेत्रा पवारांवरील टीकेवर जय पवारांचे काँग्रेसला सडेतोड उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसच्या सोशल मीडियावरून ‘गुंगी गुडिया’ अशी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वादग्रस्त पोस्टप्रकरणी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. या प्रकरणावरून सध्या काँग्रेसवर चहुबाजूंनी जोरदार टीका होत असून,…

Read More

बोजा नोंदीसाठी लाचेची मागणी महागात:राजाचे कुर्लेतील तलाठी, कोतवाल ACBच्या सापळ्यात; 3 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

सातारा जिल्ह्यात महसूल विभागातील भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी धडक कारवाई करत खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आणि कोतवाल यांना ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील ६३ वर्षीय शेतकरी यांनी कराड मर्चंट सहकारी क्रेडिट संस्थेकडून ५…

Read More