औंढा पंचायत समिती अपहार प्रकरण:दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन
औंढा नागनाथ पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेत झालेल्या ५७ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने गुरुवारी ता. १६ सकाळी आकरा वाजता जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. औंढा नागनाथ पंचायत समिती कार्यालयात कपातीच्या रकमेमध्ये तब्बल ५७ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संदर्भात लेखा विभागाच्या पथकाने केलेल्या…