Headlines

चित्रकलेत यश मिळवण्यासाठी चौफेर वाचनाचा व्यासंग आवश्यक:राज्यस्तरीय प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा; अतिथींनी केले मार्गदर्शन‎

बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालय व ललित कला अकादमीच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ परिसरातील बाबासाहेब ढोणे चित्रकला महाविद्यालयात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा व प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. चित्रकलेच्या विश्वात नाव अजरामर करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी सभोवतालचे बारकाईने निरीक्षण करणे शिकले पाहिजे. सभोवतालच्या घटना पाहणे. कान व डोळे सतत उघडे ठेवणे. सतत काम करणे. सातत्याने चौफेर वाचनाची…

Read More

शहरात सहाव्या, सातव्या दिवशी पाणी‎:पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने मनपा प्रशासनाने घेतला निर्णय

महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेकरिता मुख्य जलस्रोत असलेल्या काटेपूर्णा (महान) प्रकल्पात बुधवारी केवळ १५.८६ दलघमी (१८.३७%) इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सद्यःस्थितीत अत्यल्प पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत नसून पाण्याची मागणी मात्र सातत्याने वाढत आहे. दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय घट होत असल्यामुळे अकोला महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात सध्या चार दिवसाआड सुरू असलेला…

Read More

पावसाच्या खंडाचा फटका:बोरगाव मंजू परिसरात कुठे पिकांना फेर, तर कुठे दुबार पेरणीचे संकट, पुरेशी ओल नसल्याने पिकांच्या वाढीबाबत चिंता‎

बोरगाव मंजू परिसरात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसत आहे. मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरात खरीप पेरण्यांना वेग आला आणि शेतकऱ्यांनी आशेने पेरणी उरकून घेतली. बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी, काही भागांत पुरेशी उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे…

Read More

Latur NEET Paper Leak Case; Coaching Owner Paid 5 Lakhs to NTA Panel

CBI ने बुधवारी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणात कोचिंग सेंटर मालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी केमिस्ट्रीच्या पेपरसाठी 5 लाख रुपये दिले होते. . CBI ने एका विशेष न्यायालयाला मोटेगावकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान सांगितले की, त्यांनी NTA प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलवर असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांना 5 लाख रुपये दिले. मोटेगावकर यांचा मुलगा कुलकर्णी यांच्या…

Read More

राज्यभरात 20 जुलैपासून पावसाचा जोर वाढणार:13 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा, बळीराजाला दिलासा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० जुलैपासून महाराष्ट्रातील विविध भागांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. सध्या उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण तयार झाले असून, राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला…

Read More

सहा दिवसांच्या खंडानंतर अहिल्यानगरमध्ये अर्धा तास कोसळला दमदार पाऊस:नगर, पारनेर, श्रीगोंदे, कर्जतमध्ये सरासरी ओलांडली; राहुरी फक्त 34.7 टक्क्यांवर

. जिल्ह्यात बुधवारी अनेक तालुक्यांत पावसाने पुन्हा हजेरी लावत खरीप पिकांना दिलासा दिला. मात्र, पावसाचे चित्र अजूनही जिल्हाभर एकसारखे नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले. शहरात मागील सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी दुपारी सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला. सावेडी, कल्याण रोड, दिल्ली गेट, स्वास्तिक चौक परिसरात जोरदार सरी कोसळल्या. उड्डाणपुलाखाली काही काळ पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग…

Read More

कळमनुरीत दोन गटात हाणामारीनंतर गोळीबार:एक ठार 4 जखमी, पोलिस बंदोबस्त वाढविला, 7 जण ताब्यात

कळमनुरी शहरातील बसस्थानक परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर गोळीबार झाल्याने एक जण ठार तर चौघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. 15 रात्री साडे आकरा ते पावनेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कळमनुरी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सात जणांना ताब्यात…

Read More

सटाणा येथे एक वृक्ष, एक जीवन अभियानांतर्गत 51 वृक्षांचे रोपण:जुनावणेतील विद्यार्थ्यांना लायन्स क्लबकडून मदत‎

एचपी गॅसच्या वर्धापन दिनानिमित्त ओम गुरुदेव गॅस एजन्सी आणि दै. दिव्य मराठी यांच्या वतीने सटाणा येथील बागलाण करिअर अकॅडमी परिसरात वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी अकॅडमीच्या आवारात कडुलिंब, पिंपळ, चिंच आदींसह विविध प्रजातींच्या ५१ वृक्षांचे रोपण करण्यात…

Read More

10 दिवसांनंतर पैठणसह, ढोरकीन, बिडकीन, शिऊर, लासूरला पाऊस:अनेक शेतकऱ्यांसमोरील दुबार पेरणीचे संकट टळले‎

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पैठणसह तालुक्यातील ढोरकीन, बिडकीन, बालानगर, ढाकेफळ, चितेगाव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. चितेगाव आणि बिडकीनला दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते, तर गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, सावंगी, शिल्लेगाव, देवळी, रा‌ंजणगाव पोळ, सुलतानाबाद, वैजापूर तालुक्यातील शिऊर परिसरातही पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळणार असून, दुबार पेरणीचे संकट…

Read More

मुख्यमंत्र्यांनी घेतली नवीन पाणी योजनेची बैठक:नवी तारीख दिली तर लोक आम्हाला मारायला कमी करणार नाहीत- शिरसाट

शहराच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेवरून बुधवारी (१५ जुलै) मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोठा तणाव पाहायला मिळाला. या वेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाणी योजनेला पुन्हा नवीन तारीख दिली तर लोक आम्हाला मारायलाही कमी करणार नाहीत, अशी उद्विग्न भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत खरडपट्टी…

Read More