अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरासाठी 25 मिनिटांचा मोठा वळसा:पूर्वनियोजन नसल्याने वाहनचालकांना गल्लीबोळातून मार्ग शोधताना आली भुलभुलैय्याची अनुभूती
अहिल्यानगर शहरात दहीहंडीनिमित्त नेप्ती चौक, गंगा उद्यान, दिल्लीगेट परिसरात दहीहंडीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी प्रमुख मार्ग बंद करून वाहतूक वळवली गेली, परिणामी वाहनचालकांना गल्लीबोळातून मार्ग शोधताना भुलभुलय्याची अनुभूती आली. दहीहंडीच्या कार्यक्रमांमुळे सायंकाळपासूनच चौकांमध्ये तुफान गर्दी जमा झाली होती. प्रशासनाच्या पूर्वनियोजनाचा अभाव असल्याने ऐनवेळी कोतवाली, तोफखाना व वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून मार्ग बदलावे…