Headlines

चौथा श्रावणी सोमवार:वेरूळला 2 लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज, मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण‎

श्रावण महिन्यातील चौथ्या व शेवटच्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दोन लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर मंदिर देवस्थान ट्रस्ट . सोमवारी पहाटेपासूनच सुरू होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष बॅरिकेड्स आणि स्वतंत्र प्रवेश-बाहेर…

Read More

राज्यात 27,968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायती प्रशासकाविना:23 ऑगस्ट रोजी मुदत संपूनही शासन निर्णय होईना.. प्रशासन निर्णय घेईना

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या प्रशासकांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपली. मात्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने यासंदर्भात कसलाही आदेश काढला नसल्याने प्रशासनदेखील हतबल झाले असून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना शासन निर्णय येईना…प्रशासन निर्णय घेईना अशी म्हणण्याची वेळ आली आहे. राज्यातील 27 हजार 968 पैकी 14 हजार 234 ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी 2026 रोजी संपल्यानंतर सरपंच परिषद व इतर…

Read More

जरांगेंच्या उपोषणस्थळाजवळच ओबीसींचे बेमुदत प्रतिआंदोलन:मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको, ओबीसी नेत्यांचा एल्गार

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता ओबीसी समाजानेही त्याच गावात प्रतिआंदोलनाचे आव्हान दिले आहे. जरांगे यांच्या आंदोलनस्थळापासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या सोनियानगर भागात ओबीसी नेते ॲड. मंगेश ससाणे, विठ्ठल तळेकर, सतीश कुलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारपासून उपोषण सुरू केले आहे. एकाच गावात दोन परस्परविरोधी आंदोलने सुरू झाल्याने गावात…

Read More

संभाजीनगरला एशियनच्या आगीतून वाचलेल्या जुळ्यांचा मृत्यू:घाटी रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये सुरू होते उपचार

शहरातील एशियन हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये शुक्रवारी (४ सप्टेंबर) पहाटे लागलेल्या आगीतून ९ बालकांना वाचवले होते. यापैकी घाटीत दाखल २ नवजात जुळ्या बाळांचा रविवारी (६ सप्टेंबर) मृत्यू झाला. कन्नड येथील मुजाहिद कुरेशी आणि जबेरिया कुरेशी यांच्या या जुळ्या बाळांत एक मुलगा आणि एका मुलगी होती. या बाळांचा जन्म २५ व्या आठवड्यांत (प्री-मॅच्युअर) झाल्याने त्यांचे वजन १ किलो…

Read More

निंभोरा देलवाडी येथील जि. प. शाळेत विद्यार्थीच बनले शिक्षक:'स्वयंशिस्त विद्यालय' उपक्रमातून मिळाली नेतृत्वाची संधी; अनोखा शिक्षक दिन साजरा

निंभोरा देलवाडी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिक्षक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा होतो. शाळेतील शिक्षकांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांनाच शिक्षक बनवले. त्यांनी ‘स्वयंशिस्त विद्यालय’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तसेच, शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज अनुभवता आले….

Read More

अमरावतीत महिनाभरापासून पाऊस नाही, पिके धोक्यात:युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दुष्काळ उपाययोजनांची मागणी केली

अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, कापूस, सोयाबीन आणि तूर ही प्रमुख पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्षाने जिल्हाधिकारी आणि विभागीय कृषी सहसंचालक यांना निवेदन दिले. प्रशासनाने दुष्काळ गृहीत धरून उपाययोजना सुरू कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपलब्ध नोंदीनुसार, २६ आणि २७ ऑगस्ट…

Read More

खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण:पक्का पूल बांधण्याच्या मागणीसाठी, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

चांदूर रेल्वेच्या घुईखेड परिसरातील शेतकऱ्यांनी खारवगळ नाल्यात ट्रॅक्टर-ट्रॉलीसह बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात जाण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या या नाल्यावर पक्का पूल बांधण्याची त्यांची मुख्य मागणी आहे. शेतकऱ्यांनी ७ सप्टेंबरपासून हे आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे, नाल्याच्या पाण्यात ट्रॅक्टर-ट्रॉली उभी करून, त्यात बसून उपोषण केले जाईल. यामुळे प्रशासनाचे या आंदोलनाकडे किती गांभीर्याने लक्ष…

Read More

YCIS विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण:हॉस्टेल प्रशासनाच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या, शौचालय खराब असल्याची केली होती तक्रार

सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (वायसीआयएस) लेडीज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले असून, विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी हॉस्टेलच्या रेक्टर, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर विद्यार्थिनीने 2 सप्टेंबर 2026 रोजी…

Read More

माझ्या सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू डीजेमुळेच झाला:डीजेवर बंदी घालणे योग्यच, न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे- मेघना बोर्डीकर

सार्वजनिक सण-उत्सवांमध्ये न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून लावले जाणारे डीजे आणि लाऊडस्पीकर गरज पडल्यास बलप्रयोगाने बंद करावेत, या पुण्यातील विद्यानंद बापट यांच्या भूमिकेमुळे सध्या पुणे-मुंबईसह राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर या मुद्द्यावरून दोन गट पडले असून, एक गट डीजे आणि ढोल-ताशांच्या समर्थनार्थ, तर दुसरा गट ध्वनिप्रदूषणाचा दाखला देत डीजेबंदीच्या बाजूने उभा ठाकला आहे….

Read More

‘डीजे बंदीमुळे काहींना वाईट वाटत असेल तर वाटू द्या’:संजय शिरसाटांची ठाम भूमिका, ‘लोकांचा जीव महत्त्वाचा की आनंद?’

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजेच्या वापरावरून राज्यात चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी डीजे बंदीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “डीजे बंदी झाली पाहिजे, हेच आमचे स्पष्ट मत आहे. डीजे बंदीमुळे काही लोकांना वाईट वाटत असेल तर वाटू द्या; मात्र लोकांचा जीव महत्त्वाचा आहे की आनंद?”, असा सवाल शिरसाट यांनी केला. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने…

Read More