Headlines

MPSC Paper Leak Scandal; Rutuja Patil Arrested Amid Controversy


राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात ‘प्रेमाचा अँगल’ असल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे याने हा दावा केला असून, मूळ

.

या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, कारण ज्यांनी या गैरप्रकाराची तक्रार केली, त्यापैकीच एक असलेल्या गौरव पाटील यालाच पोलिसांनी आधी अटक केली. त्यानंतर आता या प्रकरणाचा तपास नंदुरबारपर्यंत पोहोचला असून, पोलिसांच्या पथकाने कारवाईचा फास आणखी आवळण्यास सुरुवात केली आहे.

ऋतुजा पाटील ताब्यात

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबारमधून ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे पथक सकाळपासूनच नंदुरबारमध्ये दाखल झाले होते आणि विविध ठिकाणी झाडाझडती घेतल्यानंतर ज्ञानदीप सोसायटीतील तिच्या राहत्या घरातून तिला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपासासाठी तिला मुंबईला नेण्यात येणार आहे.

भरती प्रक्रिया रद्द आणि अधिकाऱ्यांना अटक

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठी झालेली ही संपूर्ण भरती प्रक्रिया एमपीएससीने अखेर रद्द केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात धडक कारवाई करत एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांसह एकूण सहा जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये आयोगाचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे यांचाही समावेश आहे.

‘चोर सोडून संन्यासाला फाशी’

या प्रकरणात प्रेमाचा अँगल समोर आणला जात असला तरी, तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डे याने पोलिसांवर ‘चोर सोडून संन्यासाला पकडल्याचा’ आरोप केला आहे. ज्या गौरव पाटीलने आपल्यासोबत तुकाराम मुंढे आणि आयोगातील अधिकारी लेंडवे यांची भेट घेऊन या गैरप्रकाराची तक्रार दिली, तोच आरोपी कसा असू शकतो, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. तसेच, अधिकारी लेंडवे हाच या पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचा दावाही त्याने केला आहे.

मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

गांगुर्डे यांच्या आरोपानुसार, ऋतुजा किंवा तिच्या घरच्यांनी पेपर फोडलेला नसून, अटक करण्यात आलेल्या नकाते नावाच्या अधिकाऱ्याने आपल्या पुतण्यासाठी हा पेपर फोडला होता. सुरुवातीला 50 लाख रुपयांना विकला गेलेला हा पेपर, पैसे वसूल करण्यासाठी पुढे 10-10 लाख रुपयांना अनेकांना विकण्यात आला. सातारा, बीड आणि सोलापूर जिल्ह्यात या पेपरफुटीची व्याप्ती असून यात सामील असलेले अनेक जण एकमेकांचे नातेवाईक असल्याचे गांगुर्डे यांनी उघड केले आहे.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..

MPSC पेपरफुटीचे ‘लव्ह स्टोरी’ कनेक्शन!:प्रियकरानेच फोडले बिंग; ‘आदर्श शिक्षक’ बापाने मुलीसाठी 12 लाखांत खरेदी केला पेपर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदभरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात अनेक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारे खुलासे समोर आले आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमृत पाटील हे नंदुरबार येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असून, त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांनी एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांशी तब्बल 12 लाख रुपयांत पेपर खरेदीचा सौदा केला आणि त्यापैकी 5 लाख रुपये अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, त्यांच्या या गैरकृत्यामुळे 22 मार्च रोजी प्रामाणिकपणे परीक्षा दिलेल्या सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.