Headlines

NEET Paper Leak Mastermind Lokhande & Cyber Engineer Arrested in Pune



देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘युजी नीट’ (NEET UG) पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, या घोटाळ्याचे धागेदोरे थेट पुण्यातील वाघोली आणि बिबवेवाडी भागापर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राजस्थानच्या ‘एसओजी’ कडून हा तपास आता के

.

पुण्यातील फुरसुंगी भागातून शेषराव सोळंकी या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शेषराव सायबर सुरक्षा (Cyber Security) विषयाचे शिक्षण घेत होता. सायबर गुन्हे रोखण्याचे शिक्षण घेणारा हा विद्यार्थी लोखंडेच्या सांगण्यावरून पेपर विकत घेणारे विद्यार्थी शोधणे आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करण्याचे काम करत होता.

ब्युटी पार्लरच्या आडून रॅकेट

पुण्याच्या बिबवेवाडी भागात ब्युटी पार्लर चालवणारी मनिषा वाघमारे ही गेल्या तीन वर्षांपासून लोखंडेच्या संपर्कात होती. ती गरजू विद्यार्थ्यांना शोधून त्यांना प्रश्नपत्रिका विकण्याचे काम एजंट म्हणून करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

नाशिकचा ‘कौन्सलर’ आणि गुरुग्राम कनेक्शन

नाशिकच्या इंदिरानगरमधून शुभम मधुकर खैरनार याला पोलिसांनी अटक केली आहे. शुभम हा बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी असून त्याने प्रश्नपत्रिका संच हरियाणातील गुरुग्राम येथे कुरिअरद्वारे पाठवल्याचा आरोप आहे. अटकेच्या भीतीने शुभम खैरनारने चक्क टक्कल केले होते आणि तो देवदर्शनाच्या बहाण्याने पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, नाशिक पोलिसांनी केवळ दीड तासात शिताफीने त्याचा शोध घेऊन बेड्या ठोकल्या.

धनंजय लोखंडे हा वेगवेगळ्या शहरातील एजंटमार्फत प्रश्नपत्रिकांची विक्री करत होता. या प्रकरणात आतापर्यंत १६ संशयितांची नावे समोर आली असून, सीबीआयच्या चौकशीत आणखी अनेक मोठी नावे आणि आंतरराज्यीय कनेक्शन उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *