Headlines

साताऱ्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; अमेरिकन लोकांना गंडवणारे 17 जेरबंद:छापेमारीत लॅपटाॅप, रोकडसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त, गुन्हा दाखल

कोरेगाव-रहिमतपूर मार्गावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून सातारा पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. हे सायबर चोरटे ‘अ‍ॅमेझॉन’वरून खरेदी झाल्याची खोटी बतावणी करून अमेरिकन नागरिकांना डॉलरमध्ये गंडवत होते. या कारवाईत २१ लाख रोख, लॅपटॉप आणि डेटा असा एकूण ३५ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ‘श्रीसाई लॉजिस्टिक्स’च्या नावाने फेब्रुवारी २०२६ पासून…

Read More

BJP chief Nitin Nabin slams Mallikarjun Kharge’s ‘snake’ remarks against BJP, RSS

Marathi News National BJP Chief Nitin Nabin Slams Mallikarjun Kharge’s “snake” Remarks Against BJP, RSS नवी दिल्ली7 तासांपूर्वी कॉपी लिंक भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ‘साप’ या विधानावर तीव्र हल्ला चढवला आहे. ते म्हणाले की, खरगे यांची टिप्पणी लोकांना जातीय आधारावर भडकवण्याचा प्रयत्न आहे आणि ही…

Read More

अखंड हिंदुस्थानातील पहिला गणेशोत्सवसाेलापूरच्या आजाेबाच:राज्य शासनाची मोहोर!, सांस्कृतिक महोत्सवासाठी 10 लाख निधी खर्च करण्यास सांस्कृतिक विभागाची मान्यता

सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? भाऊ रंगारी की टिळक? या प्रश्नावर पुण्यात अजूनही वाद सुरू आहे. अशा स्थितीत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ‘अखंड हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव’ असा उल्लेख करून सोलापूरच . यातून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय २ जुलैला प्रसिद्ध झाला. अखंड हिंदुस्थानात सोलापूरचे आजोबाच सार्वजनिक…

Read More

विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यासाठी घाटनांद्रा परिसरात जि.प. शाळेच्या गुरुजींची धडपड:विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढीचा ध्यास; जिल्हापरिषदेचा शिक्षक आपल्या दारी उपक्रम‎

प्रतिनिधी | घाटनांद्रा सध्याच्या काळात ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शाळेतील घटती पटसंख्या ही शिक्षण क्षेत्रासमोरील एक गंभीर समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांनी एक अनोखा पुढाकार हाती घेत ‘शिक्षक आपल्या दारी’ उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शिक्षक उन्हाची तिव्रता असतानाही गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर जाऊन पालकांशी थेट संवाद साधत विद्यार्थ्यांना शाळेत…

Read More

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन:शहाण्यांचा सायकॅट्रिस्ट म्हणून ओळख; मानसिक आरोग्य चळवळीचा चेहरा पडद्याआड

मानवी मनाचे बारकावे, मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि मनोविकारांविषयी समाजात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी आयुष्यभर काम करणारे ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ, लेखक आणि नाटककार डॉ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी सकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला….

Read More

चित्रपट महामंडळाला स्थिर कार्यकारिणी देणार: राजेभोसले:मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनलची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्वाही

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समर्थ पॅनलने महामंडळाला स्थिर, पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्यकारिणी देण्याची ग्वाही दिली आहे. पॅनलचे प्रमुख तथा चित्रपट निर्माते मेघराज राजेभोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अभिनेता सुशांत शेलार, दिग्दर्शक दीपक कदम, लेखक राज काझी, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निर्माते सुनील महाजन, दिग्दर्शक अजित शिरोळे, कार्यकारी निर्माता…

Read More

पुण्यामध्ये 11 महिन्यांत 94 बांगलादेशी अटकेत:फरासखाना पोलिसांची पुन्हा धडक कामगिरी

पुणे पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्ध सुरू ठेवलेली शोधमोहीम तीव्र केली असून, फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा मोठी कारवाई केली आहे. या मोहिमेत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या ५ बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या ११ महिन्यांत एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात…

Read More

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट:भीमा नदीकाठच्या गावांत वीजपुरवठा‎ खंडित; उभ्या पिकांची होतेय होरप‌‌ळ‎

यंदा उन्हाचा तडाखा तीव्र असतानाच पंढरपूर तालुक्यातील महावितरणच्या अघोषित भारनियमनामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील इसाबावी, चिंचोली भोसे, आणि गुरसाळे या भागात भीमा नदीच्या किनाऱ्यावर पाणी उपलब्ध असूनही, वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे उभ्या पिकांची मोठी होरपळ सुरू आहे. ‘पाणी पायथ्याला आणि उन्हाचा आगडोंब माथ्याला’ अशी अत्यंत बिकट स्थिती सध्या या भागात निर्माण झाली आहे….

Read More

निसर्गचक्र राखणे मानवी जीवनासाठी महत्त्वाचे:उपवनसंरक्षक अर्जुना यांचे जलपात्र वितरण कार्यक्रमात प्रतिपादन, वॉर संस्थेचा पुढाकार

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी मानवी जीवन सुखकर आणि सुसह्य ठेवण्यासाठी निसर्गचक्र कायम राखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. पशु, पक्षी आणि जंगल या सर्व बाबींचे योग्य संतुलन राखणे ही काळाची गरज असून, मानवी जीवन या चक्राचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. हे चक्र राखण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले….

Read More

लोकलमधील हत्याकांड:मयंककडून झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून चाकूने भोसकले- रोशन, नार्वेकरांचे शासनास निवेदन सादर करण्याचे आदेश

मुंबईतील लोकलमध्ये हजारो प्रवाशांच्या उपस्थितीत भरदिवसा एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या गंभीर घटनेचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकार आणि गृह विभागाला या प्रकरणी जाब विचारला, तर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून प्रशासकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आरोपी रोशन सुवर्णाची…

Read More