नसरापूर चिमुकली अत्याचार-खून खटला अंतिम टप्प्यात:राज्याच्या इतिहासातील सर्वात जलद खटला ठरण्याची शक्यता; महिनाभरात निकालाची चिन्हे
पुणे जिल्ह्यातील नसरापूर (ता. भोर) येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या क्रूर अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या खटल्याचे कामकाज अत्यंत वेगाने आणि दररोज चालवले जात असून, आतापर्यंत तब्बल ५३ महत्त्वपूर्ण साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभराच्या आतच या प्रकरणाचा अंतिम निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून,…