Headlines

हरियाणवी गायक मासूम शर्मा विरोधात FIR दाखल:देहरादूनमध्ये स्टेजवरून शिवीगाळ केल्याबद्दल कारवाईची मागणी; सोशल मीडियावरही ट्रोल

डेहराडूनमधील एका कार्यक्रमादरम्यान मंचावर अपमानास्पद भाषा वापरल्याप्रकरणी हरियाणवी गायक मासूम शर्मा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सत्यम शिवम स्टुडंट्स युनियन (डीएव्ही कॉलेज) चे विद्यार्थी प्रतिनिधी प्रांचल नौनी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्री ११ वाजता गुन्हा नोंदवला. यापूर्वी, पोलिसांनी गायकाला १५ दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगणारी नोटीस बजावली होती. दरम्यान,…

Read More

सेन्सेक्स 500 अंकांनी घसरून 77,700 वर:निफ्टी देखील 120 अंकांनी खाली 24,200 वर, बँकिंग आणि ऑटो शेअर्समध्ये घसरण

सेन्सेक्स आज 20 जुलै रोजी 500 अंकांनी (0.65%) घसरणीसह 77,600 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 120 अंकांची (0.50%) घसरण आहे, तो 24,200 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात बँकिंग आणि आयटी शेअर्समध्ये खरेदी आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार: दक्षिण कोरियाचा निर्देशांक 4% घसरला शुक्रवारी अमेरिकन बाजारातही घसरण झाली शुक्रवारी सेन्सेक्स वाढीसह बंद झाला होता शुक्रवार, 17…

Read More

हायकोर्टाचा तुकाराम मुंढेंच्या विभागाला दणका:वर्ध्याच्या 'गोरस भंडार'वरील कारवाई बेकायदेशीर ठरवली, परवाना पूर्ववत करण्याचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथील ‘गोरस भंडार’ संस्थेवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने केलेली परवाना निलंबन आणि सील ठोकण्याची कारवाई बेकायदेशीर ठरवली आहे. न्यायालयाने एफडीएची ही कारवाई कायद्याच्या चौकटीत योग्य नसल्याचे स्पष्ट करत, गोरस भंडारचा परवाना तातडीने पूर्ववत करण्याचे आणि सील हटवण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे गेल्या महिनाभरापासून बंद असलेले…

Read More

उद्धव ठाकरेंनी भाजपची नव्हे, स्वतःच्या पक्षाची चिंता करावी:चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार, 'खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच' असल्याचा पुनरुच्चार

“उद्धव ठाकरेंनी भाजपची चिंता अजिबात करू नये, त्याऐवजी त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावे. त्यांचा पक्ष दिवसेंदिवस लहान होत चालला आहे, आधी त्याची काळजी घ्यावी. त्यांचे सर्व लोक त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात आहेत,” अशा शब्दांत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या यवतमाळमधील सभेनंतर बावनकुळेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. भाजप विचारांसाठी,…

Read More

देशी गोवंश रक्षणासाठी 22 जूनपासून 'गोमाता संवाद यात्रा':महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभागाचे संयुक्तपणे आयोजन

महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत राज्यभर होणार आहे. या यात्रेचा शुभारंभ २२ जून २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात होईल, अशी माहिती…

Read More

तळेगावात रस्त्यावर पाणी, रस्ता खचला:पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीदरम्यान घडली घटना

तळेगाव दाभाडे येथील संभाजीनगर परिसरात मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पाणी येऊन रस्ता खचल्याच्या घटनेनंतर तळेगाव नगर परिषदेने खुलासा केला आहे. ही घटना पाणीपुरवठा योजनेच्या नियोजित तांत्रिक चाचणीदरम्यान घडली, असे नगर परिषदेने स्पष्ट केले. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात पाण्याच्या टाक्या, मुख्य दाबनलिका आणि वितरण नलिका टाकण्याची कामे झाली आहेत. या योजनेतील संभाजीनगर येथील नव्याने बांधलेल्या पाण्याच्या…

Read More

युवकांनी निर्व्यसनी राहून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे:धोडंबे येथील गोरक्षनाथ स्कूलमध्ये डॉ. साळुंके यांचे आवाहन‎

देशाचे भवितव्य असलेल्या युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आपली ऊर्जा, कौशल्ये, क्षमता राष्ट्रनिर्मितीसाठी वापरावी, असे आवाहन नशाबंदी मंडळाचे नाशिक जिल्हा संघटक तथा मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश साळुंके यांनी केले. जिल्हा समाजकल्याण कार्यालय नाशिक, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य (मुंबई) आणि मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘नशामुक्त भारत अभियान सप्ताहा’चा शुभारंभ धोडंबे…

Read More

उदय सामंतांवर महेश शिंदेंचा जोरदार पलटवार:म्हणाले- माझं नाव घेण्याचं धैर्य त्यांच्यात नाही; साताऱ्यात शिवसेनेतील संघर्ष उफाळला

सातारा जिल्ह्यातील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उघडपणे समोर आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फलटणमधील मेळाव्यात नाव न घेता केलेल्या टीकेला कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझं नाव घेण्याएवढं त्यांचं धैर्य नाही, अशा कठोर शब्दांत महेश शिंदे यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला. या वादामुळे साताऱ्यातील शिवसेनेतील गटबाजी पुन्हा चर्चेत…

Read More

राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा एल्गार:16 जूनपासून सेवा ठप्प होण्याची शक्यता; वाचा काय आहेत मागण्या

अनेक प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार दाद मागूनही प्रशासन केवळ वेळखाऊ धोरण राबवत असल्याचा आरोप करत, राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. उद्यापासून (16 जून) राज्यभरातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा एल्गार पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील वाहन परवाने, गाड्यांचे पासिंग, आरसी बुक यांसह आरटीओ कार्यालयातील बहुतांश सर्वच कामे ठप्प होण्याची शक्यता असून सर्वसामान्यांना फटका बसणार…

Read More

स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ पंढरीत अर्धनग्न आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरणवर मोर्चा‎

राज्य शासनाने वीज ग्राहकांसाठी प्रस्तावित केलेल्या स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात पंढरपूर शहरात बुधवारी अनोखे आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले. शिवक्रांती युवा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कंदील हाती घेऊन आणि अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत महावितरण प्रशासनाचा निषेध केला. पंढरपूर शहरात महावितरण कडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात आहेत,…

Read More