मिरगव्हाण ते कोंढेज रस्त्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती:आपलं गाव आपली माणसंच्या पाठपुराव्याला यश
मिरगव्हाण ते कोंढेज (प्रजिमा) करमाळा मार्गावरील वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर ”आपलं गाव आपली माणसं” या सामाजिक संस्थेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाला जाग आली असून रखडलेल्या कामाला आता गती मिळाल्याचे दिसून येत आहे. मिरगव्हाण हा करमाळा तालुक्यातील शेवटचा भाग असून हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र…