'त्वचादानासाठी देशात सक्षम यंत्रणा उभारा':खासदार विनोद तावडेंची राज्यसभेत आग्रही मागणी; 'नोटो'अंतर्गत स्किन बँक्स वाढवण्याचे आवाहन
गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशात त्वचादान आणि ‘स्किन बँकिंग’ची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस व राज्यसभा खासदार विनोद तावडे यांनी आज राज्यसभेत केले. या संवेदनशील मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधताना त्यांनी संपूर्ण देशभरात त्वचादानासाठी व्यापक यंत्रणा उभारण्याची मागणी केली. तसेच ‘नोटो’ (NOTTO) अंतर्गत देशभरात स्किन बँक्सची स्थापना, कोल्ड-चेन नेटवर्कची…