हिंगोलीत आधार प्रमाणीकरणासाठी दोन दिवसीय शिबीर:DDR सुरेखा फुपाटे यांची माहिती, आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारीही उपस्थित राहणार
हिंगोली जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने अंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी शेतकऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने ८ ठिकाणी गुरुवारपासून ता. १३ दोन दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांनी दिली आहे. हिंगोली जिल्हयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिल्या टप्यात ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक क्रमांक बंधनकारक…