Headlines

गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का:वडेट्टीवारांच्या बालेकिल्ल्यात 'ऑपरेशन लोटस'; धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

गडचिरोलीच्या राजकारणात अत्यंत मोठी आणि खळबळजनक घडामोडी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या गडचिरोलीतील राजकीय बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आणि उपनगराध्यक्षांसह तब्बल ९ नगरसेवकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नागपुरात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिमाखात पार पडला. धानोरा नगरपंचायत…

Read More

महाराष्ट्र दिनी संविधान चौकात काळे फुगे सोडले:विधानसभेवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; 10 जण अटकेत

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीने (विराआस) तीव्र निदर्शने केली. संविधान चौकात काळे फुगे सोडून आणि विधानसभेच्या गेटवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करून ‘महाराष्ट्र निषेधदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, तारेश…

Read More

परिचारिकांचे काम बंद,‎रुग्णालयाबाहेर निदर्शने‎:सुधारित सेवा प्रवेश नियम,पदोन्नतीसाठी आंदोलन

सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित, न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या (एमजीएनएफ) नेतृत्वाखाली मंगळवारी, ४ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. या हाकेला ओ देत येथील परिचारिकांनी दोन तास काम बंद ठेऊन त्या-त्या रुग्णालयात निदर्शने केली. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, जीएमसी, क्षय रुग्णालयात सकाळी ७.३० ते ९.३०…

Read More

‘ज्योतिबांचा लढा…पेटला लढा’ कार्यक्रम रंगला:आ. प्रवीण पोटे यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन : मान्यवरांची उपस्थिती‎

सर्व शाखीय माळी महासंघ, अमरावतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधणारे आ. प्रवीण पोटे यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच शेगाव नाका येथील अभियंता भवनात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेश खारकर होते. या सोहळ्यात प्रबोधनकार, गायक व भावस्वरांजली संचाचे प्रस्तुतकर्ता प्रा. मोहन इंगळे यांनी सादर केलेल्या ‘ज्योतिबांचा…

Read More

अचलपूर व्हिडिओ प्रकरण:त्या नराधमाला जन्मठेपच झाली पाहिजे, कारवाई अशी करा की पुन्हा कोणी धाडस करणार नाही- रवी राणा

अचलपूर आणि परतवाडा परिसरात मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आमदार रवी राणा यांनी संताप व्यक्त केला असून आरोपीला कठोर जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर लव्ह जिहाद करणाऱ्या आमच्या हिंदू मुलींना फसवून व्हिडिओ काढले अशा विकृतीला वेळ आली तर आमच्या ताब्यात द्यावे…

Read More

दरोड्याच्या तयारीतील 5 गुन्हेगारांना अटक:नागपुरात 4.82 लाखांचा मुद्देमाल जप्त, एक साथीदार फरार

नागपूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचने अटक केली आहे. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांना घोरपड रोडवरील कृष्णा डेव्हलपरच्या मोकळ्या शिवारात काही संशयित घातक शस्त्रांसह दरोड्याची योजना आखत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती….

Read More

नसरापूरप्रकरणी नराधमाच्या शिक्षेवर आज अंतिम निर्णय शक्य:फाशी की जन्मठेप यावर निर्णय, सरकारी वकिलांची मृत्युदंडाची मागणी

नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला सोमवारी विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. आरोपीला मृत्युदंड की जन्मठेप, याबाबतचा अंतिम निर्णय होणार असून या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह नागरिक आणि विविध सामाजिक संघटनाही न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. विशेष न्यायाधीश एस. आर….

Read More

‘चिया सीड्स'ला 21 हजार 100 रुपये दर:कमी खर्चात बंपर उत्पादन होताना मंदीमुळे दरात प्रति क्विंटल 3 हजारांची घसरण‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी “चिया सीड्स’ची (काळ्या-पांढऱ्या रंगाचे खाद्य बीज) तब्बल १४६ कट्ट्यांची मोठी आवक झाली. यावेळी चिया सीड्स उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे जास्तीत-जास्त २१,१०० रुपये तर कमीत-कमी ८,००० रुपयांचा दर मिळाला. यासोबतच बाजारात २० कट्टे काळे जिरे (शहाजिरे) विक्रीसाठी आले होते, त्यालाही २१,२०० रुपयांपासून १७,१०० रुपयांपर्यंतचा चांगला भाव मिळाला. अकोला बाजार समितीने या…

Read More

रुग्णवाहिकेला चालक नाही अन् रस्ता खराब:मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेला दुचाकीवर नेले, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; गडचिरोलीतील घटना

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. तसेच दळणवळणाचीही दुरावस्था दिसून येत आहे. याचाच फटका एका महिलेच्या जिवावर बेतला आहे. वेळेवर उपचार तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिला दुचाकीवरून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळी आली होती. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी…

Read More

सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी:सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हे ही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात असे समोर आले आहे की, मुख्य आरोपी सिया गोयलने घटनेपूर्वी इंटरनेटवर इंदूरमधील राजा रघुवंशी हत्याकांडाची माहिती गोळा केली होती. पोलिसांनुसार, सियाने इंटरनेटवर ‘पोलिस कोठडीत महिलांना मारहाण होते का’ हे देखील शोधले होते. ही संपूर्ण माहिती सियाच्या दोन्ही मोबाईलच्या सर्च हिस्ट्रीतून मिळाली. पोलिस 2 दिवसांपूर्वी सियाला तिच्या घरी घेऊन…

Read More