आंबे गावातील नागणे दाम्पत्य मृत्यू प्रकरणी वारसांना 5 लाखांची मदत:मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या विधानसभेतील पाठपुराव्याला यश
आंबे येथील लक्ष्मण नागणे आणि अलका नागणे या शेतकरी दाम्पत्याचा विजेचा धक्का लागून २८ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मृत्यू झाला होता. नैसर्गिक आपत्ती आणि वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे मृत्यू ओढवलेल्या नागणे दाम्पत्यांच्या वारसांना राज्य शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली असून वारसांपैकी एकाला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले…