Headlines

तामीळनाडूच्या कामगाराचा हिंगोलीत हृदयविकाराने मृत्यू:कुटुंबाला मदत करीत पोलिसांनी दाखवली खाकीतील वर्दीतील माणूसकी




तामीळनाडू राज्यातील कामगाराचा हिंगोलीत ऱ्हदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर कामगाराच्या कुटुंबावर दुःखाची डोंगर कोसळला. सोमवारी ता. १० सकाळी शासकिय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन झाले. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हिंगोली शहर पोलिसांनी आवश्‍यक मदत करून खाकी वर्दीतील माणूसकीचा प्रत्यय दाखवून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमीअमन कोविल भागातील रहिवासी असलेले सुरेश आरमुगम (४४) हे मागील काही दिवसांपासून हिंगोली येथे भांडे विक्री करणाऱ्या तामीळनाडूच्याच व्यावसायीकासोबत काम करतात. हिंगोली शहरातील स्मार्ट सीटी भागात ते काम करीत असून त्या ठिकाणी सुरेश यांच्यावर कामगारांचे भोजन तयार करण्याची जबाबदारी आहे. दरम्यान, नेहमी प्रमाणे सुरेश यांनी ता. ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी भोजन तयार करून कामगारांना दिले. त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखत होते. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. सदर प्रकार त्यांनी तेथील पी. प्रभाकरन यांना सांगितला. त्यांनी तातडीने सुरेश यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जांहिर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जमादार शेख अमजद यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पाहणी केली. या घटनेची त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. सुरेश यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने पोलिसांनी त्यांना तातडीने पैसे पाठवून त्यांना बोलावून घेतले. त्यांचे कुटुं्बिय सोमवारी हिंगोलीत आल्यानंतर मयत सुरेश याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. हिंगोली शहर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना आवश्‍यक मदत करून खाकी वर्दीतील माणूसकीचा प्रत्यय दाखवून दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *