Headlines

हिंगोली जिल्ह्यात डिझेलची अचानक मागणी वाढल्याने टंचाई:वाहनधारकांनी आवश्यक तेवढेच डिझेल घ्यावे, प्रशासनाचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात डिझेलची अचानक मागणी वाढली असून त्यामुळे डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असून वाहनधारकांनी आवश्यक तेवढे डिझेल भरावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसापासून डिझेलची मागणी अचानक वाढली आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून नांगरणी व…

Read More

इथेनॉलमुळे पेट्रोल टाकीत काळे बुरशी जमा:मायलेज झाले कमी, सर्व्हिसिंगचा खर्चही दुप्पट, ओलाव्यामुळे इंजिनमध्ये गंज

विक्रम दिल्लीतील पालिका भवनात काम करतात. तीन वर्षांपूर्वी त्यांनी जुनी कार खरेदी केली. एक वर्षानंतरच कारच्या इंधन प्रणालीत (फ्यूल सिस्टम) समस्या निर्माण झाली. कारमध्ये फक्त 10% इथेनॉल (E10) असलेले पेट्रोल टाकता येत होते, पण 20% इथेनॉल असलेले, म्हणजेच E20 इंधन टाकले गेले होते, असे त्यांना समजले. याचा परिणाम कारच्या मायलेजवरही दिसून येत आहे. पहिल्या वर्षी…

Read More

गुन्हा दाखल, प्रियकर तुरुंगात;तरीही मुली म्हणतात तोच होणार माझा धनी:किशोरवयातील भावनिक निर्णयांचे गंभीर सामाजिक, कायदेशीर परिणाम

“माझे माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबतच संसार करायचा आहे,” असे ठामपणे सांगणारी 18 वर्षांची तरुणी आजही आपल्या निर्णयावर ठाम आहे. अल्पवयीन असताना ती प्रियकरासोबत घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या तक्रारीवरून संबंधित तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि त्याला कारागृहात जावे लागले. मुलगी मात्र आजही त्याच्यासोबत आयुष्य घालवण्याचा निर्धार व्यक्त करते. ही…

Read More

दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला:गुरुपौर्णिमेचे औचित्य अन् 'रयत शिक्षण संस्था'चा विषय, वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होणार आणि शरद पवार गट केंद्र सरकारला पाठिंबा देऊन एनडीएमध्ये सामील होणार, अशा चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. या सर्व घडामोडी चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पुण्यातील मोदी बाग निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. या…

Read More

वरुडमधील 32 टक्के लाभार्थी एप्रिलच्या रेशनपासून वंचित:मुदतवाढीसाठी आ. यावलकर यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांची भेट‎

महाराष्ट्र शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे रेशन एकत्र देण्याचा निर्णय घेतला खरा. परंतु प्रशासकीय ढिसाळपणामुळे वरुड तालुक्यातील हजारो लाभार्थी एप्रिल महिन्याच्या अन्नधान्यापासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर समस्येची दखल घेत मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू यावलकर यांनी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली….

Read More

India Life Insurance Growth; Shift Beyond Tax Saving & Financial Security

मुंबई16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय नागरिकांमध्ये जीवन विम्याबाबत कमालीची जागरूकता निर्माण झाली असून, विम्याकडे केवळ ‘करबचतीचे साधन’ म्हणून न पाहता ‘दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचा साथीदार’ म्हणून पाहण्याचा सकारात्मक बदल देशात दिसून येत आहे. भारताच्या विमा माहिती ब्युरोने (IIB) संकलित केलेल्या आर्थिक वर्ष 2011 ते आर्थिक वर्ष 2025 या 5 वर्षांच्या कालावधीतील आकडेवारीच्या विश्लेषणातून भारतातील विमा संरक्षणाच्या…

Read More

UAE ने तेल उत्पादक देशांच्या संघटनेतून ओपेक-ओपेक प्लस सोडले:इराण युद्धादरम्यान तेलाच्या बाजारात अनिश्चितता वाढली; ट्रम्प यांचा मोठा राजनैतिक विजय

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) मंगळवारी (28 एप्रिल) कच्चे तेल उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या देशांच्या ओपेक (OPEC) आणि ओपेक प्लस (OPEC+) संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद झाले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घकाळापासून ओपेकचा भाग असलेल्या UAE च्या या पावलामुळे सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील या गटाच्या एकतेवर…

Read More

काँग्रेसने राम मंदिरातील देणगी चोरीवर प्रश्न उपस्थित केले:राठोड म्हणाले- सुप्रीम कोर्टाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करावी; SIT वर आक्षेप

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ठियोगचे आमदार कुलदीप राठोड यांनी राम मंदिरात कथित देणगी चोरीच्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) कार्यरत न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर केंद्र सरकारवर हे प्रकरण दाबण्याचा आणि दोषींना वाचवण्याचा…

Read More

‘माती वाचवा, पाणी वाचवा; भविष्य वाचवा’चा विद्यार्थ्यांचा जागर:मृद व जलसंधारण सप्ताहात भाग्योदय विद्यालयात ; वृक्षदिंडी, रॅलीसह विविध उपक्रमांना प्रतिसाद‎

माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. भविष्यातील पिढीचे जीवन सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मृद व जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाची चळवळ घराघरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जलसंधारण विभाग . भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मृद व जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षदिंडी, जनजागृती रॅली,…

Read More

ओबीसी आरक्षणाला हात लावला तर रस्त्यावर उतरू:मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटणार? तायवाडेंच्या इशाऱ्याने सरकार अलर्ट मोडवर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार जाहीर केल्यानंतर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, जरांगेंच्या आंदोलनाआधीच आता ओबीसी समाजही आक्रमक झाला असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारला थेट इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करताना…

Read More