आंतरराष्ट्रीय योग दिन:दररोज किमान एक तास योग, प्राणायाम करणे ही काळाची गरज- कृष्णा दहेतकर, घाटनांद्रा येथील शाळांत विद्यार्थ्यांनी केली योग प्रात्यक्षिके
निरोगी आणि सुदृढ जीवनासाठी केवळ आंतरराष्ट्रीय योग दिनापुरतेच मर्यादित न राहता, प्रत्येकाने दररोज किमान एक तास योग व प्राणायाम करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा दहेतकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी घाटनांद्रा येथील जिल्हा परिषद प्रशाला, इंद्रगढी प्राथमिक…