परिस्थितीशी जुळवून घेताना तत्त्वांशी तडजोड नको:आयएएस तुकाराम मुंढे यांचे उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ‘विवेक'' जपण्याची गरज
जीवनात येणाऱ्या चढ-उतारांमुळे खचून न जाता परिस्थितीशी झुंज देणे आवश्यक आहे. यश किंवा पद मिळाले तरी आपल्या मूळ मूल्यांशी व तत्त्वांशी कधीही तडजोड करू नये, असे स्पष्ट आणि परखड मत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. शहरातील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल कॅम्पसमधील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित ‘संवाद तरुणाईशी’ या कार्यक्रमात…