मनपातर्फे शहरात डेंगूमुक्त अभियानाला सुरुवात:श्रमिकनगरमध्ये डेंगू जनजागृतीचा प्रभावी उपक्रम, परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
अहिल्यानगर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रमिकनगर येथे ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा’ शुभारंभ महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानांतर्गत परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली तसेच नागरिकांमध्ये डेंगू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती बारस्कर म्हणाल्या, आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात….