मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या दिंड्यांना 2.80 कोटींचे अनुदान मंजूर:मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत प्रति दिंडी 20 हजार वाटप सुरू
मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी ८० लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या देखरेखीखाली या निधीचे थेट बँक खात्यात वाटप सुरू झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत नव्याने स्थापन झालेल्या ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ने…