विकसित महाराष्ट्रसाठी राज्यस्तरीय शहरी संवाद:अमरावतीचे महापौर श्रीचंद तेजवानी यांचा सत्कार
विकसित महाराष्ट्र २०४७” या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय शहरी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अ. भा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमात राज्यातील महापौर, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खा. मेघा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यांनी पारदर्शक, नागरिकाभिमुख प्रशासनावर भर दिला. या प्रसंगी…