सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'हिरकणी' अखेर सुरक्षित!:10 दिवसांच्या चिंतेनंतर वन विभागाला मोठा दिलासा, मात्र गळ्यातील 'सॅटेलाइट पट्टा' बेपत्ता
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध ‘हिरकणी’ (STR T6) वाघिणीच्या सुरक्षेबाबत गेल्या 10 दिवसांपासून निर्माण झालेली चिंता अखेर मिटली आहे. वन्यजीव विभागाने लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्यात हिरकणी नुकतीच कैद झाली असून, ती अत्यंत सुदृढ स्थितीत असल्याची आनंददायी माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या गळ्यातील उपग्रह संचलित स्थानदर्शक पट्टा (सॅटेलाइट जीपीएस कॉलर) गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील 10…