Headlines

मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी

मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी एमएसआरडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. घटनास्थळी पाहणीनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात अचानक बदल झाला….

Read More

आजच्या पिढीने क्रांतिसूर्य महात्मा फुले यांचे विचार आत्मसात करण्याची गरज:क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विविध संस्था संघटनांच्यावतीने अभिवादन‎

. तत्कालीन समाजातील जातिभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील मक्तेदारीविरुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी संघर्ष केला. समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी महात्मा फुले यांनी केलेले कार्य आजच्या काळातही दिशादर्शक व प्रेरणादायी ठरत आहे. महात्मा फुले यांच्या विचारांची आजच्या समाजाला सर्वाधिक गरज आहे. महात्मा फुलेंनी त्या काळात समाज परिवर्तनासाठी जे कार्य केले, ते अत्यंत…

Read More

FSSAI Issues 9 Notices to Swiggy Instamart Over Spoiled Food Complaint

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड रेग्युलेटर FSSAI ने क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्विगी इन्स्टामार्टला 9 नोटिसा बजावल्या आहेत. FSSAI ला तक्रार मिळाली होती की, प्लॅटफॉर्मने त्यांना सडलेली अंडी, खराब दूध आणि एक्सपायरी डेट असलेले पॅक केलेले अन्न दिले. FSSAI ने स्विगी इन्स्टामार्टकडून या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण आणि कंप्लायन्स रिपोर्ट मागवला आहे. जर कंपनीने ठरलेल्या वेळेत योग्य…

Read More

चारधाम यात्रा आजपासून, 18.25 लाख भाविकांनी नोंदणी केली:19 एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे दरवाजे उघडतील; ऑफलाइन नोंदणी काउंटरही सुरू

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा शनिवारपासून सुरू होईल. ऋषिकेशमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यमुनोत्री व गंगोत्री धामसाठी 10 बस रवाना करतील. हे यात्रेकरू 19 एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे दरवाजे उघडताना उपस्थित राहतील. चारधामसाठी आतापर्यंत 18.25 लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी 23 लाख भाविकांनी नोंदणी केली होती. गुरुवारपासून ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये ऑफलाइन नोंदणी काउंटरही सुरू झाले आहेत….

Read More

दिग्दर्शक डेव्हिड धवन भावुक:मुलगा वरुण धवनचे कौतुक करताना डोळे पाणावले, म्हणाले- प्रत्येक आई-वडिलांना असा मुलगा मिळावा

‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात दिग्दर्शक डेव्हिड धवन भावुक झाले. मुलगा वरुण धवनबद्दल बोलताना त्यांचे डोळे पाणावले. डेव्हिड धवन म्हणाले, ‘प्रत्येकाला वरुणसारखा मुलगा मिळावा. मी रुग्णालयात असतानाही तो माझ्यासोबत तिथेच झोपायचा. एक अभिनेता म्हणूनही त्याच्यात सतत सुधारणा होत आहे. तुम्ही जे काही मागाल, ते तो तुम्हाला देईल, पण एक…

Read More

रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमतेसाठी योगाभ्यास आवश्यक:मोटर वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांचे प्रतिपादन, दिव्य मराठीशी साधला संवाद

रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालविण्याची संस्कृती रुजविण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन मोटर वाहन निरीक्षक तथा योगशास्त्री वसंत कलंबरकर यांनी दिव्य मराठीशी बोलतांना केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने बोलतांना त्यांनी ‘योगिक प्रक्रिया, रस्ता सुरक्षा आणि कार्यक्षमता’ या लेखातून त्यांनी योग आणि वाहन चालक यांचा थेट संबंध स्पष्ट केला आहे. रस्ता…

Read More

अमित शहा अन् फडणवीसांच्या आदेशानेच आंदोलकांवर क्रूर अत्याचार:महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नव्हे तर शहाच- हर्षवर्धन सपकाळ

दिल्लीमधील आंदोलनात एकीकडे क्रुर तर दुसरीकडे विकृत असे वर्तन केंद्राच्या आणि राज्याच्या गृह विभागाकडून बघायला मिळाले. जर गृहविभाग असे कृत्य करतो आणि कोणतीच कारवाई होत नाही, त्यावेळी गृहमंत्र्यांचाच त्या कारवाईसाठी आदेश असेल याची शक्यता नाकारता येत नाही, ही शक्यता असल्याने कोणत्याच पोलिसांवर कारवाई करण्यात आली नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. देवेंद्र…

Read More

जायखेडा विद्यालयामध्ये ईव्हीएमवर शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक:अधिकृत निकालातून विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव‎

लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने येथील कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक पार पडली. मतदान केंद्र, मतदार यादी, ईव्हीएमद्वारे मतदान, मोबाईल ॲपचा वापर, मतमोजणीच्या फेऱ्या आणि अधिकृत निकाल घोषणेमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. मुख्य निवडणूक अधिकारी व्ही. पी. शेवाळे आणि सहाय्यक निवडणूक…

Read More

दर्यापूर न.प. महिला व बालकल्याण विभागातर्फे मार्गदर्शन शिबिर:विविध सरकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजन

दर्यापूर नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समता नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हे शिबिर पार पडले. महिला व बालकल्याण उपसभापती मंगला तराळे यांनी शिबिराचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी नगरसेवक प्रदीप मलिये आणि नगरसेविका रमा सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपसभापती मंगला तराळे यांनी उपस्थित महिलांना नगरपालिकेद्वारे राबविण्यात येणाऱ्या…

Read More

शेतकरी कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, अधिकाऱ्यांच्या 'मग्रुरी'वरही ओढले ताशेरे

राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही निव्वळ ‘बनवाबनवी’ आणि ‘फसवी’ असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मंगळवारी (३० जून) विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून आणि मग्रुरीवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच, याआधी काल (२९ जून) विधानसभेत बोलतानाही त्यांनी ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीच्या दाव्यातील फोलपणा आणि…

Read More