बहिणीच्या प्रेमाला ‘स्पीड पोस्ट’ची साथ; राखी पोहोचणार वेळेत:‘राखी मेल सर्व्हिस’मधून 10 टक्के सवलत; देश-विदेशात राखी पाठविण्याची सुविधा
भाऊ कितीही दूर असला, तरी बहिणीच्या प्रेमाला अंतराची सीमा नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची ओढ प्रत्येक बहिणीला असते. मात्र प्रत्यक्ष भेट शक्य नसलेल्या बहिणींची हीच भावनिक ओढ आता टपाल विभाग पूर्ण करणार आहे. ‘राखी मेल सर्व्हिस . यंदा २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन साजरे होणार असून, त्यासाठी अहिल्यानगर टपाल विभागाने विशेष तयारी केली…