दमदार पावसाच्या प्रतीक्षेत संत्रा, मोसंबी उत्पादक:कलमा तयार, 365 शासनमान्य नर्सरी, समाधानकारक दर मिळण्याची अपेक्षा
सातपुड्याच्या पायथ्याशी आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट परिसरात संत्रा, मोसंबी व लिंबूची कलमे विक्रीसाठी तयार झाली आहेत. आता लागवडीसाठी अनुकूल आणि दमदार पावसाची प्रतीक्षा उत्पादक शेतकरी करत आहेत. पाऊस चांगला झाल्यानंतर राज्यासह राजस्थान, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांतील शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात कलम खरेदीसाठी येतात. शेंदूरजनाघाट परिसर संत्रा कलम उत्पादनासाठी देशभरात ओळखला जातो. तिवसाघाट, सातनूर,…