आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी 'महाराष्ट्र दर्शन' सहल ठरली दिशादर्शक:55 जणांनी प्रथमच पाहिली रेल्वे; शेगावच्या स्वच्छतेने जिंकले मन
अनेक दशके घनदाट जंगलात घालवल्यानंतर ऑक्टोबर २०२५ मध्ये आत्मसमर्पण केलेल्या ६१ नक्षलवाद्यांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘महाराष्ट्र दर्शन’ सहल त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारी ठरली आहे. या प्रवासादरम्यान या समूहाने बाहेरील जगातील विकास प्रत्यक्ष अनुभवला. विशेष म्हणजे, यातील ५५ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच बाहेरील जगात पाऊल ठेवले होते. ज्यांनी आतापर्यंत रेल्वे फक्त बोर्डवरील चित्रांमध्ये पाहिली होती,…