2023 चा महिला आरक्षण कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी:यात बदलासाठी सरकारने 3 नवीन विधेयके आणली; विरोधक म्हणाले- कायदा नाही तर दुरुस्ती कशी
केंद्र सरकारने महिला आरक्षण कायदा म्हणजेच ‘नारी शक्ती वंदन अधिनियम, 2023’ 16 एप्रिल 2026 पासून लागू केला आहे. संसदेत गुरुवारपासूनच त्याच्या दुरुस्तीवर 3 दिवसांसाठी चर्चा सुरू झाली. दरम्यान, मध्यरात्री मूळ कायदा लागू करण्याची अधिसूचना जारी करण्यात आली. याचा अर्थ असा आहे की, महिला आरक्षणाच्या ज्या कायद्यात दुरुस्तीची चर्चा केली जात आहे, तो लागूच झाला नव्हता….