छत्रपती संभाजीनगरमध्ये 'चड्डी-बनियान गँग'ची एन्ट्री?:बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी परिसरात १७ एप्रिल रोजी मध्यरात्री बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा ‘चड्डी-बनियान गँग’ सक्रिय झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, चोरट्याने एटीएम मशिनचे नुकसान केले असले तरी बँकेची अभेद्य सुरक्षा यंत्रणा भेदण्यात त्याला अपयश आल्याने लाखो रुपयांची रोकड बचावली आहे….