पाथर्डीत वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा:पत्रे उडाली, गावांत वीज गुल, अवकाळी संकटामुळे नागरिकांची उडाली तारांबळ,मदतीची मागणी
पाथर्डी तालुक्यासह शहरात सोमवारी रात्री वादळी वाऱ्यासह गारपीटयुक्त पावसाने जोरदार हजेरी लावली. जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या अवकाळी संकटामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून शहरात काही ठिकाणी फ्लेक्स बोर्ड कोसळले. तसेच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना रात्रभर अंधाराचा सामना करावा लागला. सोमवारी संध्याकाळनंतर अचानक हवामान…