कालव्यातून पाईप ओढताना पाय दोरीत अडकला:तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील घटना
वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात कालव्यातून पाईप नेतांना हात अन पाय दोरीत अडकल्याने तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 12 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गणेशपूर गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गणेशपूर शिवारात बाभणाजी वाघमारे (38) यांचे शेत…