Headlines

पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा:न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले; पेन्शनला पैसे नाहीत, पण योजनेसाठी कोट्यवधी?

राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या योजनेवरून राज्य सरकारला तीव्र शब्दांत सुनावले आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन व इतर लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्यास ही योजना बंद करण्याचा विचार करा, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे….

Read More

कॉक्राेच जनता पार्टीचे दीपके दिल्लीमध्ये निदर्शने करणार:परीक्षा वाद – शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

सोशल मीडियावर व्यंग्यात्मक मोहिमेने चर्चेत आलेल्या ‘कॉक्राेच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके शनिवार, ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात परतणार आहेत. भारतात आल्यानंतर ते नीट-यूजी, सीबीएसई, सीयूईटी व इतर परीक्षांतील वादांवरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दीपके म्हणाले – नोकरी सोडली, अटकेची भीतीही बोस्टनमध्ये जनसंपर्काचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर…

Read More

पुणे महापालिकेची ‘पेस एज्युकेशन ट्रस्ट’वर कारवाई:10 वर्षांसाठी काळ्या यादीत, 10 लाखांची ठेव जप्त; अटी व शर्थी उल्लंघनाचा ठपका

पुणे महानगरपालिकेने (मनपा) ‘मे. पेस एज्युकेशन ट्रस्ट’वर मोठी कारवाई केली आहे. राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संचालनासंदर्भात करारातील अटी व शर्तींचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी मनपाने या संस्थेला पुढील १० वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. तसेच, संस्थेकडे जमा असलेली १० लाख रुपयांची सुरक्षा ठेवही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे मनपाच्या माध्यमिक व…

Read More

पंजाब भाजपच्या 2 कार्यालयांवर हल्ला, व्हिडिओ:काठ्या-लाठ्या घेऊन लोक घुसले, तोडफोड केली, दगडफेक केली; भिंती आणि पोस्टर्सवर शाई फेकली

पंजाबमध्ये सोमवारी भाजपच्या दोन कार्यालयांमध्ये गोंधळ आणि तोडफोड झाली. मोहालीच्या झिरकपूरमध्ये 5 मुखवटाधारी तरुण भाजप कार्यालयात घुसले आणि भिंती व पोस्टर्सवर शाई फेकून गोंधळ घातला. आरोप आहे की, तरुणांनी भाजप नेते गुरदर्शन सैनी यांच्या फोटोवरही शाई फेकली. घटनेदरम्यान कार्यालयात गोंधळ उडाला आणि आरोपी काही वेळाने घटनास्थळावरून पळून गेले. तरनतारणमध्येही भाजप कार्यालयावर हल्ला झाला. 15 ते…

Read More

कन्हान नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:कामठी येथे सहलीचा दुर्दैवी शेवट, 6 वर्षांच्या बालकाचाही समावेश

नागपूरजवळील कामठी परिसरात कन्हान नदीच्या पात्रात रविवारी दुपारी एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा वर्षांच्या बालकाचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ६ वर्षीय चैतन्य बबलू अंबादे, ३१ वर्षीय गौतम राजकुमार अंबादे आणि ३३ वर्षीय रोहित कैलास नागदेवे यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका भागातील अंबादे आणि…

Read More

कृषी:कांदा दरात झालेल्या घसरणीने बळीराजाच्या अडचणीमध्ये वाढ; प्रतिक्विंटल १२०० पर्यंत घसरण, शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत

प्रतिनिधी | अहिल्यानगर महिनाभराच्या कालावधीत जिल्हाभरातील कांद्याच्या दरामध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला मिळणारा भाव एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लक्षणीयरीत्या खाली आला असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला आहे. मागील महिनाभरातील स्थिती पाहता सुमारे प्रतिक्विंटल सुमारे ३०० रुपयांची घसरण झाली आहे. सद्यस्थितीत एक नंबर कांदा अवघा ९०० ते १२००…

Read More

ग्रंथदानातून उभारले जाणार ज्ञानालय; नाकोडे विद्यालयाचा अभिनव उपक्रम:जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसाठी सुरू होणार वाचनालय‎

ग्रंथदान हेच श्रेष्ठदान ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवत नाकोडे येथील मविप्र समाजाच्या शाळांनी अभिनव ग्रंथदान अभियान सुरू केले आहे. या उपक्रमांतर्गत जुनी-नवी पुस्तके संकलित करून विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांसाठी वाचनालय सुरू करण्यात येणार असून, ग्रामीण भागात वाचन संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाला पंचक्रोशीतील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ३०० पुस्तके देण्यासाठी २० नागरिकांनी…

Read More

दगडूशेठ ट्रस्टतर्फे मोफत महाआरोग्य शिबीर:23 मे रोजी नू.म.वि. प्रशालेत, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली….

Read More

मुंबई लोकलमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर:धावत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये रक्तरंजित राडा, 2 जण गंभीर जखमी, VIDEO

मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अत्यंत गंभीर आणि चिंताजनक होत चालला आहे. अवघ्या महिनाभरापूर्वी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या एका तरुणाच्या हत्येची घटना ताजी असतानाच, 15 जुलै रोजी मध्यरात्री चालत्या लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या रक्तरंजित राड्यात 2 प्रवासी गंभीर जखमी झाले असून, यामुळे मुंबईकरांमधून तीव्र…

Read More

सीईओ सत्यम गांधींकडून दर्यापूरमधील विकासकामांची तपासणी:आरोग्य, घरकुल, नरेगा, स्वच्छता योजनांच्या अंमलबजावणीची प्रत्यक्ष पाहणी

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय आणि विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या दौऱ्याची सुरुवात येवदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भेटीने झाली. परिसरातील अस्वच्छता पाहून सीईओ गांधी यांनी तीव्र नाराजी…

Read More